आष्टी
तालुक्यातील पिंपळा येथील आशाबाई संतोष शिंदे (वय 52) या महिलेने मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तहसिलदारच्या दालनातच विष प्राशन करून,माझ्या बाजूने कोर्टाचे निकाल असूनही,तलाठी,मंडळअधिकारी हे नोंद लावित नसून,तहसिलदार यांनी पैसे घेऊन,माझ्या बाजूने निकाल असूनही मलाच नोटीस दिल्याने तहसिलदारच्या दालनातच विष घेतल्याने आष्टी परिसरात एकच खळबळ उडाली.सदर महिलेला आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार आशाबाई संतोष शिंदे वय 52 वर्ष रा.पिंपळा,ता.आष्टी,जि.बीड येथील रहिवासी असून,त्यांची पिंपळा येथे स.नं.293 मध्ये 1 हे. व 294 मधील क्षेञ 0.80 हे.आर असे एकूण साडेचार एकर जमिनीचा वाद अप्पर विभागीय आयुक्त कार्यालय यांचे आदेश प्रकरण क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61 दि.10/7/2018 आदेशाच्या नाराजीने प्रस्तुत पुनरलोकन अर्ज दाखल करण्यात आला होता.हे प्रकरण क्र.क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61या प्रकरणाबाबत मी पुन्हा दाखल केले होते.त्याचा निकाल दि.3/12/2021 माझ्या बाजूने लागला असून,या निकालात स्पष्ट असे म्हटले आहे की,अर्जदार यांचा पुनरवालोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे.या न्यायालयाचा आदेश क्र.
दि.10/07/2018 आदेश रद्द करण्यात येत आहे.अप्पर जिल्हाधिकारी बीड यांचा आदेश क्र.2017/सिडी/अपील/सीआर-26 दि.19/3/2018 आदेश कायम करण्यात येत आहे.आशा प्रकरचा निकाल 312/2021 रोजी अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 यांनी दिला आहे.सदरचा आदेश आशाबाई संतोष शिंदे यांच्या हक्कात झाल्यामुळे फेर क्र.3655 मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय देण्यात आला.असूनसुध्दा माझी नोंद होत नाही त्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“जमिनीचा वाद वीस वर्षापासून असून,मला अप्पर विभागीय आयुक्ताने न्याय दिला पण तरी देखील गेल्या चार महिन्यापासून फेर रद्द करण्यासाठी निकालाच्या प्रति घेऊन तलाठी,तहसिल कार्यालयात हेलपाटे मारले तरी सुध्दा मला न्याय मिळाला नाही.त्यामुळे मी जिवाला कंटाळून तहसिलदार यांच्या दालनात जाऊन विष घेतले मला न्याय नसल्याने जगून तरी माझा काय उपयोग आहे.मला न्याय मिळावा हिच माझी मागणी आहे.”
-आशाबाई संतोष शिंदे,पिडीत महिला
“या प्रकरणात एकाच जमिनीचे कोर्ट डिग्री आधारे एक व खरेदी खता अधारे एक दोन वेगवेगळे निकाल लागल्याने संबंधितास या कार्यालयाचे पञ 29/4/2022 नुसार आपण वरिष्ठ कार्यालयाचे किंवा न्यायालयाचे आदेश प्राप्त करून या कार्यालयास अपील दाखल निर्णय जो येईल त्या निकालाप्रमाणे आम्ही नोंद करणार आहोत.”
विनोद गुंड्डमवार,तहसिलदार आष्टी