राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पाठविलेल्या निवेदनात माजी मंत्री पिचड़ यांनी म्हटले आहे की-आदिवासी जिल्ह्रामध्ये करोना संकटामुळे रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.
आदिवासी भागासाठी खावटी योजना सुरु केली त्याबद्दल आभार मानले आहे. आदिवासी शेतकऱ्यांवर भात लावणी, नाचणी लावणीचे मोठे संकट उभे राहीलेले आहे.
भात लागवडीसाठी मजुराची व नांगरणी करण्यासाठी बैलाची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.
त्याचप्रमाणे बैल औताची गरज आहे, काही ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणी करण्याची पध्दत आहे.
त्यामुळे भात व नाचणी, वरई लागवडीसाठी नाइलाजाने सावकरांकडे कर्जासाठी जाण्याची वेळ येत आहे.
किमान आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवड(आवणी) त्याचप्रमाणे नागली, वरई लागवडीचा कार्यक्रम हा रोजगार हमी योजनेत घेण्यात यावा.
त्याचप्रमाणे बैलाची नांगरणी, टॅक्टर नांगरणी याचाही रोजगार हमीमध्ये समावेश करुन किमान शेतीची लागवड होईल .
15 जून नंतर भात, वरई व नाचणी लागवडीचा कार्यक्रम सुरु होत असतो त्यामुळे हे सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करावेत म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होण्यास मदत होईल असेही निवेदनात म्हटले आहे.