नगरपंचायत निवडणूक:172 उमेदवारांनी केले अर्ज दाखल

- Advertisement -
- Advertisement -

 

आष्टी,प्रतिनिधी

आष्टी नगरपंचायत निवडणूक च्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ओबीसी  आष्टी नगरपंचायत आरक्षण असलेल्या प्रभाग वगळून सुमारे 13 प्रभागात दिवसभरात 114 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

आता पर्यंत 172 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची  नगरपंचायत माहिती  सहाय्यक निवडणूक अधिकारी विनोद गुंड्डमवार यांनी दिली.

आष्टी नगरपंचायत मध्ये एकूण 17 प्रभागाची निवडणूक होत आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने  शहरातील चार प्रभागातील ओबीसी  नगरपंचायत आरक्षण असलेल्या प्रभागाची निवडणूक रद्द झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

आज निवडणूक विभागाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील ओबीसी आरक्षण असलेले प्रभाग सोडून इतर 13 प्रभागाचे अर्ज स्वीकारले सायकाळी पाच वाजेपर्यंत 114 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

नगरपंचायत निवडणूक 2021 ओबीसी आरक्षणाने उमेदवार नाराज

आष्टी शहरातील 17 प्रभाग असून त्यातील प्रभाग क्र.3,4,6 व 11 हे प्रभाग ओबीसी आरक्षणासाठी सुटले होते.पण सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने वरील चार प्रभागातील निवडणूका स्थगीत करण्यात आल्याने ओबीसी इच्छूकांची मोठी निराशा झाली आहे.वरील चार प्रभागात 18  उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles