दिव्या पुजारी ची भारतीय शुटींगबॉल संघाची कर्णधारपदी निवड

- Advertisement -
- Advertisement -

दाढ बुद्रुक येथे दिव्याचा नागरी सत्कार

गौरव डेंगळे

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील शूटिंगबॉल खेळाडू कु दिव्या पुजारीची आगामी आशियाई शुटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या दिव्या शालेय शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी येथे झाले.वडील श्री राजेंद्र पुजारी स्वतः व्हॉलीबॉल प्रशिक्षक असल्यामुळे बालपणापासून तिला व्हॉलीबॉलची गोडी लागली होती.

एकूण ११ वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले तसेच १ वेळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात त्याची निवड करण्यात आली होती.

आतापर्यंत तिने राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४ सुवर्णपदक राज्यासाठी पटकावले आहेत.

आशियाई शूटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप दिनांक १ व २ जून दरम्यान दिल्ली येथे आयोजित होणार आहे.या स्पर्धेमध्ये भारत,श्रीलंका,पाकिस्तान,बांगलादेश,नेपाळ, यूएई,भूतान हे राष्ट्र सहभागी होणार आहेत.

भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल राज्यभरात दिव्याचे कौतुक होत आहे.
आज दाढ बुद्रुक येथे पुणे विभागीय १८ वर्षा खालील मुला-मुलींच्या निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. निवड चाचणी दरम्यान कु दिव्याचा सत्कार महात्मा फुले विद्यालय चे प्राचार्य प्रभाकर सांगळे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष  पार्थ दोशी, क्रीडा मार्गदर्शक  राजेंद्र कोहकडे, राजेंद्र पुजारी, पुणे विभागीय सचिव  दादासाहेब तुपे,व्हॉलीबॉल प्रशिक्षक  कुलदीप कोंडे, उदय ठोंबरे, पापा शेख, नितीन बलराज, दत्ता घोरपडे, शैलेंद्र त्रिपाठी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

दहावी बारावीचा निकाल वेळेत लावणार-वर्षा गायकवाड

तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्याची इरा ढेकणे १७ वर्षा खालील भारतीय व्हॉलीबॉल संघात सराव शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल तर राज्य स्पर्धेत उत्कृष्ट सेटिंग केल्याबद्दल नंदिनी भागवत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे विभागातील बहुसंख्येने खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles