पाच हजार किलो गोमांससह आयशर टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

गोमांस
गोमांस

 

नगर

in article

जामखेड हुन अहमदनगर कडे गोमांस घेऊन जाणारा आयशर टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने चिचोंडी शिवारात पकडला .या टेम्पोतून 5 हजार किलो गोमांस विक्रीसाठी घेऊन जात होते.

या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या माहितीनुसार तौफिक कुरेशी, अहमदनगर हा त्याचे हस्तका मार्फत अहमदनगर कडुन जामखेडच्या दिशेने एक लाल रंगाचा आयशर मधुन गोवंशीय जातीची जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने आयशर टेम्पोमधुन वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून नगर जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे लाल रंगाचा टेम्पो थांबवला असता
टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली.

त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमांस हे तौफिक कुरेशी व अब्दुल बारी कुरेशी दोन्ही, अहमदनगर यांचे मालकीचे आहे व गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता घेवुन चाललो असल्याची कबुली दिली.

यावरून पोलिसांनी आरोपी तौफिक कुरेशी व अब्दुल बारी कुरेशी दोन्ही, अहमदनगर मोहसीन मेहमुद खान वय 40, रा. कोठला, अहमदनगर, सलीम कलीम कुरेशी वय 34, रा. कुरेशी हॉटेल जवळ, अहमदनगर मुळ रा. बहिराईच, बरेली, जिल्हा लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला . 5,000 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेला लाल रंगाचा आयशर टेम्पो असा एकुण 14,50,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नगर तालुका पोलीस स्टेशन 811/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई नगर तालुका पोस्टे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक,राकेश ओला अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here