कै वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळेत वसतिगृह विद्यार्थ्यासाठी योग शिबीराचे आयोजन

कै वसंतराव नाईक प्राथ.व माध्यमिक आश्रमशाळेत वसतिगृह विद्यार्थ्यासाठी योग शिबीराचे आयोजन

अंबाजोगाई
वसतिगृह निवासी विद्यार्थ्यांचे मानसिक व शारिरिक आरोग्य चांगले रहावे व मुलांच्या सर्वांगीन विकास साधावा यासाठी भारत सरकार च्या आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य वर्धिनी उपकेंद्र राडी यांच्या सहकार्याने कै.वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आनंदनगर, अंबाजोगाई येथे सकाळी ७ ते ८.३० या वेळेत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या योग शिबीरात *आदरणीय योगगुरु उत्तरेश्वर पांचाळ* यांनी अगदि सोप्या पध्दतीने बालकांना योगासन , प्राणायाम व आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठीचे व्यायाम प्रकार व कृती समजुन देत मुलांकडुन उत्साहाने करवुन घेतले.

in article

कार्यक्रमाच्या प्रांरभी मा. योगगुरुच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करुन नारळ वाढवण्यात आले. मा.योगगुरुंचा सत्कार प्राथमिक शाळेचे *मुख्याध्यापक मा.श्री. सुनिल रामधन राठोड* सरांनी मानाचा शाल व श्रीफळ देवुन केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना *योगाभ्यासाची विद्यार्थ्यांसाठी गरज* यावर वसतिगृह अधिक्षक मा.श्री.बालासाहेब कराड सरांनी संबोधीत केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतिगृह अधिक्षीका श्रीमती जाधव मॅडम, महादेव घुले, प्रदीप पवार ई. वसतिगृह कर्मचारी व वसतिगृह विभाग विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी मुख्यमंत्री चि.कृष्णा जाधव, चि. अंकुश राठोड, नैतिक थोरात, राम लांब व ईतरांनी बहुमोल परिश्रम घेतले.
शेवटी आयोजक वसतिगृह अधिक्षकांनी योगगुरु पांचाळ गुरुजी, संस्थाचालक, प्राथ. व माध्य. मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद चे आभार मानुन शिबीराची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here