- Advertisement -
- Advertisement -
अकोले , ता . १४:
डोक्यावर पेटलेले कठे, त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला, शरीरावर ओघळणारे उकळलेले तेल मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद, देवतांच्या नावाचा जयघोष संबळ, धोंदाना- पिपाणी, डफ, ताशा आदी पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईईईई हाईईईई’ असा लयबद्ध चित्कार करीत लोक बिरोबाचा गजर करीत आपले नवस फेडून संस्कृती जपतात.