ई डी, ‘त्या’ खात्यातून कोट्यवधी रुपये हडपण्याचा प्रयत्

ई डी

 

अहमदनगर -प्रतिनिधी

in article

ई डी आयकर खाते आणि सक्त वसुली संचालनालयाच्या आदेशाने सीझ केलेल्या खात्यातून पैसे काढण्याचा खटाटोप करण्याचे प्रयत्न सुरु आहेत .

या संदर्भात नगरमधील एका नामांकित मल्टी स्टेट बँकेची (अर्बन बँकनव्हे) दिशाभूल करण्यात आली आहे.

खोट्या कागद पात्रांच्या आधारे या खात्यातील कोट्यवधी रुपयावर डल्ला मारण्याचा प्रकार घडतो आहे. हा प्रकार संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या ध्यानात आल्याने आता ही कागदपत्रे आयकर खात्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली.

या खात्याचा अहवाल गुरुवारी दुपारी बँकेला प्राप्त झाला तेव्हा ही बनवाबनवी बँकेच्या लक्षात आली. आता बँक खोटे पुरावे देणाऱ्या लाभार्थीवर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे आहे.

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आयकर कार्यालय व सक्त वसुली संचालयानालायाकडे तक्रार करण्यात आली आहे. येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला .

तेव्हा हा प्रकार उघड झाला. या संदर्भात आयकर विभाग आणि संबंधित बँकेकडे माहिती चौकशी केली असता त्यात तक्रारदारांना यात काहीतरी काळेबेरे होत असल्याचे दिसले.

त्यानंतर या संदर्भात विविध विभागाकडे तक्रार करून कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

नगर शहरातील एका नामांकित मल्टीस्टेट बँकेत हे खाते आहे. त्या खात्यातून नोटबंदी च्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली होती . या खात्याचे व्यवहार संशयास्पद होते. त्यामुळे केंद्रीय आयकर खात्याने या बचत खात्याची चौकशी सुरु केली. या चौकशीत गैर मार्गाने खात्यात क्षमतेपेक्षा जास्त पैसे आल्याचे आयकर विभागाच्या लक्षात आले.

याचा आयकर रीतसर भरला गेला नाही तेव्हा आयकर विभागाने हे खाते सील केले. तेव्हा पासून हे खाते बंद होते. पण त्यात कोट्यवधी रुपये बेहिशबी पडून होते.

आयकर खात्याने संबंधित खातेदाराकडे वारंवार या प्रकरणाबाबत विचारणा केली होती . यात काही मध्यस्थानी हे पैसे परत घेण्याचा खटाटोप सुरु केला.

आणि खोटी कागदपत्रे सादर करून आयकर विभागाने गोठविलेले खाते पुन्हा सुरु करण्याबाबत बँक व्यवस्थापनावर दबाव आणण्यात आला.

बाजारातून गैर मार्गाने कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी या खात्याचा उपयोग होत असल्याचे आयकर विभागाच्या लक्षात आले. त्यामुळेच कारवाई झाली .

तरी देखील आता या विषयात मुंबई आणि गुजराथ मधील स्वतःला बिग बुल समजणाऱ्या मोठ्या प्लेअर्स नी हे सील काढण्यासाठी खटाटोप सुरु ठेवला आहे.

मध्यस्थामार्फत बँकेकडे आयकर विभागाने कारवाई थांबविल्याची खोटी कागद पत्रे बँकेला देण्यात आली. आता बँकेने मध्यस्थामार्फत हे पैसे द्यावेत या साठी दबाव आणण्यात येतो आहे.

राज्यसभा पोटनिवडणुक काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कर चुकवून जमा केलेली कोट्यवधीची रक्कम गैर मार्गाने हडप करण्याचा हा डाव असून या बाबत तक्रारी झाल्यानंतर आता आयकर खाते आणि ई डी अर्थात सक्त वसुली संचालनालय खरच कारवाई करणार? याकडे तक्रारदार लक्ष ठेऊन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here