आष्टी, प्रतिनिधी
अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने क्षेत्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले.
मात्र आष्टी तालुक्यातील दोन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले.या पार्श्वभूमीवर या बत्तीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जामखेड नगर रस्त्यावर चिंचपूर येथे रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारने खास बाब म्हणून आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा आणि टाकळशिंग या दोन महसूल मंडळातील शेतकर्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
जर हिवाळी अधिवेशन पूर्वी ही मागणी पूर्ण न झाल्यास अधिवेशनानंतर मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे
राज्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्र घोषित करताना आष्टी तालुक्यातील या दोन महसुली मंडळे वगळण्यात आली.
या भागातील शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याचे त्यांनी नमूद करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी हरिनारायण आष्टा, चिंचपूर, टाकळशिंग यासह इतर गावांचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.