- Advertisement -
- Advertisement -
अहमदनगर — राजूर येथे चार ट्रक धान्याचा पकडून पोलिसांनी ५६ लाखाचा माल हस्तगत केला . तर सहा आरोपीना अटक देखील केली . त्यापकी चार आरोपीना चार दिवसाची कस्टडी दिली तर दोन आरोपी राष्ट्रवादी उपाध्यक्ष संतोष परते व गोदाम पाल भाऊसाहेब गंभिरे याना एक दिवसाची कस्टडी देण्यात आली होती आज सोमवारी राजूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी नितीन खैरनार यांनी मा. न्यायालयाकडे तपास करण्यासाठी न्यायालयीन कस्टडी मागितली असता आरोपीचे वकील ऍड . बाळासाहेब वैदय , ऍड . दत्ता निगळे यांनी बाजू पटवून देत आरोग्याचे कारण सांगत सहाही आरोपीना जामिनावर सोडण्यात आले मात्र तपास कामी पोलिसांना सहकार्य करून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे . मात्र सध्या तालुक्यात प्रत्येक गावात स्वस्थ धान्य वाटपाबाबत शन्का निर्माण झाली असून चाळीस गावात पंचनामा केल्याशिवाय महिन्याचे धान्य ताब्यात न घेण्याचा निर्णय झाला असून तरुण कार्यकर्ते आक्रमकतेत दिसत आहे . तर तहसीलदार कार्यालयात होणार हा अनागोंदी कारभार बंद करावा या मागणीसाठी लोकडाऊन संपल्यानंतर आदिवासी समाज आक्रमक होऊन या घटनेचा पाठपुरावा करणार असून पुढारी व्यक्तीला ठेका देऊ नये महिला बचत गट याना हा ठेका देण्याची मागणी जोर धरू लागली आहे . तर शिवसेनेचे नेते बाजीराव दराडे , मारुती मेंगाळ ग्राहक संघटनेचे मच्छिन्द्र मंडलिक यांनी मुख्यमंत्री , राज्यपाल यांचेकडे निवेदन पाठवून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते .
Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक