मुंबई
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के होणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी केंद्रीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. मात्र राज्यात सरकार मध्ये उलथापालथ झाल्याने राज्य सरकारी कर्मचारी यांची वाढ रोखली होती. पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला.