आष्टी, प्रतिनिधी
बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन आष्टी येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आला.निमित्त होते,पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी.
पोलीस आणि नागरिक यांचा सुदृढ संवाद असावा याच हेतूने पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलिस स्टेशन आष्टी हद्दीमधील पोलीस पाटील सरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दरबारामध्ये जनतेने त्यांना असलेल्या अडचणी पोलीस अधीक्षक यांच्या समोर मांडल्या. बीड पोलीस अधीक्षक राजा यांनी जनतेस समाजामध्ये शांतता राखण्याचे तसेच आपण समाजासाठी चांगले काम करून छोट्या छोट्या कारणावरून होणाऱ्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करावा.आणि पोलिसांना सहकार्य करावे पोलीस सदैव आपल्या रक्षणासाठी तयार आहेत, असे आवाहन केले.
आणखी वाचा :crop insurance,पीकविमा साठी किसान सभेची शिरसाळा ते बीड संघर्ष दिंडी!
बीड पोलीस अधीक्षक यांचा संवाद
त्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा दरबार घेऊन अडचणी जाणून घेतल्या. आणि त्या तात्काळ दूर करण्यात येतील असे सांगितले.तसेच आरोग्य व परिवारावर लक्ष द्यावे आणि दिलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. उत्कृष्ट कामगिरी करावी जेणेकरून पोलिसांची प्रतिमा उंचावेल असे त्यांनी सांगितले. यावेळी कडा येथील सामजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, सुनील रेडेकर,आदि उपस्थित होते.