अकोले , ता . १४:
डोक्यावर पेटलेले कठे, त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला, शरीरावर ओघळणारे उकळलेले तेल मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद, देवतांच्या नावाचा जयघोष संबळ, धोंदाना- पिपाणी, डफ, ताशा आदी पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईईईई हाईईईई’ असा लयबद्ध चित्कार करीत लोक बिरोबाचा गजर करीत आपले नवस फेडून संस्कृती जपतात.

मात्र या वर्षी कोरोना मुळे हि यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच भाऊराव भांगरे , उपसरपंच सुरेश भांगरे , मंदिर समन्वयक दत्ताभाऊ भोईर यांनी दिली केवळ पाच ग्रामस्थ मंदिरात जाऊन धार्मिक विधी व पूजन करणार असल्याचे ते म्हणाले त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांनी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
डोक्यावर पेटलेले कठे …. त्यातून उस



