आष्टी मुंबई रेल्वेची घोषणा रेल्वेमंत्री दानवे करणार काय?
अहमदनगर-
न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा रेल राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता अहमदनगर येथून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ होत आहे.या निमित्ताने आष्टी मुंबई या गाडीची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रावसाहेब दादाराव पाटील दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या आदरणीय उपस्थितीत अहमदनगर- न्यू आष्टी आणखी एक नवीन डेमू (DEMU) रेल्वे सेवेला अहमदनगर रेल्वे स्टेशन स्थानकाहून, दि. 17.11.2022 रोजी दुपारी 3.30 वा. ला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करणार आहेत.
आष्टी नगर रेल्वे उदघाटन करताना आष्टी मुंबई रेल्वे होणार असे बोलले जात होते.तसेच आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी आष्टी मुंबई पर्यंत रेल्वे जावी यासाठी मागणी या उदघाटन कार्यक्रमात केली होती.
आता या रेल्वे ला क्रमांक प्राप्त झाला आहे.त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत.त्यामुळं ही रेल्वे पुढे मुंबई पर्यंत नेण्याची घोषणा दानवे करणार काय याकडे सर्व बीड आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.