आठ दिवसात बीड जिल्ह्यात २४६१ रुग्ण;दररोज होतोय तीनशे पार
बीड दि २ एप्रिल, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात २४६१ रुग्ण वाढले आहेत. दररोज बीड जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण तीनशेच्या वर आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढत असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. आज बीड जिल्ह्यात ३८३ रुग्ण बाधित आले आहेत.
बीड जिल्ह्यात काल बाधितांची संख्या ३९३ इतकी आली होती. आज ही संख्या १० ने कमी झाली असली समाधान मानण्यासारखी परिस्थिती नाही.
कोरोना साखळी कशी वाढतेय ?
टाळेबंदी झाल्यानतर खर तर संख्या घटायला हवी होती. मात्र संख्या सातत्याने वाढतेय. एका घरात एक बाधित झाल्यावर त्याचा फेरा घरातील इतर व्यक्तीपर्यंत पोहचतो. दुसरा बाधित होण्याचे लक्षणे काही दिवसांनी दिसतात. मात्र त्यापूर्वी केलेली टेस्ट निगेटिव्ह आल्याने तो स्वतः ला निगेटिव्ह समजतो मात्र काही दिवसानंतर त्याचे अज्ञान दूर होऊन तो पोझीटीव्ह होतो. त्यामुळे काही दिवसांसाठी घराघरात ही साखळी सुरु राहत आहे.
कोरोना ची भीती गेली , पण कोरोना आहे!
जनजीवन सुरुळीत होत असताना कोरोना गेला असे समजून अनेक नागरिक गावागावात बिना मास्क आणि काळजी न घेता वावरत आहेत. गावातल्या पारावर, बस स्टेंड वर, दुध डेअरी वर आणि मंदिराच्या समोर हे चित्र सरार्स पहावयास मिळते. आणि वरून काय होते कोरोनाने असेही व्याक्य कानावर पडतात. मात्र प्रत्यक्षात कोरोना झालेल्या व्यक्तींच्या अनुभव ऐकल्यावर कोरोना चे असली रूप कळते. त्यासाठी सावधानता सुरक्षितता आणि मास्क वापरण्याची गरज आहे.
नागरिकांना ताळेबंदी मध्ये शिथिलता दिल्याने नागरिक मोकाट सुटल्यासारखे फिरताना दिसतात. १ वाजेपर्यंत शिथिल आहे, म्हणून विनाकारण फिरणार्यांची संख्या अधिक असते. शासकीय कार्यालये कोरोना हब बनताना दिसत आहेत.
यामध्ये शासकीय कार्यालये, शाळा, जिल्हा परिषद, जिल्हा कारागृह, अंबेजोगाई मेडिकल परिसर, खासगी रुग्णालये,एसटी डेपो, एसटी स्टेंड, पोलीस स्टेशन यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील कोणत्या तालुक्यात किती संख्या आली ?
अंबेजोगाई ८४, ,आष्टी ३९, ,बीड १०८, धारूर १६, गेवराई १३,केज ३८,माजलगाव १९,परळी १८,पाटोदा २९,शिरूर १०, वडवणी ९, यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बीड अंबेजोगाई परळी आणि आष्टी येथील रुग्णांची संख्या वाढत आहे.
बीड जिल्ह्यातील गेल्या सात दिवसातील कोरोना मीटर
२ एप्रिल ३८३ १ एप्रिल ३९३ ३१ मार्च ३२५
३० मार्च ३१८ २९ मार्च ३८३ २८ मार्च २८४
२७ मार्च ३७५ २६ मार्च ३८३
आष्टी तालुक्यातील कोणत्या गावात किती आले ?
सराटेवडगाव २, कडा १, देवी निमगाव २,करंजी१, कडा कारखाना ९ ,डोंगरगण २,खुंटेफळ पुंडी १, आष्टी १० , डोईठाण १,खिळद २, जामगाव 3 , कासारी १ , चिंचपूर १ , गौखेल १, निमगाव चोभा १ ,सावरगाव १ यांचा समावेश आहे.
आज आलेल्या अहवालात ३८३ बाधित २२९६ निगेटिव्ह आले आहेत.
आणखी वाचा : आठ दिवसापासून कोरोना संख्या कमी होईना