अकोले, ता.१० – पुणे येथून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघालेले सतीश सुरेश घूले,वय ३४ पिंपरी चिंचवड, गुरु राजेश्र्वर शेखर वय ४२, समीर राजूरकर वय ४४ वर्षे, हे एम .एच.१४ के .वाय. ४०७९ या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी निघाले असता कोतुळ वरून राजूर कडे जाण्याऐवजी मॅप प्रमाणे अकोले कडे निघाले. मात्र जुन्या पुलाचा पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने तिघेही गाडीसह रात्री पावणे दोन वाजता पुलाच्या खाली वाहत गेले नी त्यात सतीश सुरेश घुले वय 34 ,याचा मृत्यू झाला .
केवळ चुकीच्या रस्त्याने गेल्याने पुलाचा अंदाज न आल्याने एका भाविकाला आपले प्राण गमवावे लागले .दोघेजण पोहता येत असल्याने पोहून ते पुलावर आले गावात निरोप जाताच चंद्रकांत घाटकर व काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन सकाळी पोहणारे नदीत उतरून गाडीस हा मृतदेह बाहेर काढला .(एका)
पिपरी चिंचवडमध्ये दुःखाचे वातावरण असून नातेवाईक कोतुळ येथे पोहचले आहे .मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले .घटना समजताच पोलीस निरीक्षक अजय परमार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांचे बरोबर तपासी अंमलदार सहाय्यकफौजदार सय्यद हे होते. अ.मृत्यू रजी.नं.०४/२०२१ सी आर पी सि.१७४ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक मनोज पाटील,उप विभागीय अधिकारी मदने यांच्या आदेशाने पोलीस शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व घारगाव पोलीस निरीक्षक सुनील पाटील हेही घटना स्थळी उपस्थित होते.(एका)
जलसंपदा विभागाने या बंद असलेल्या पुलावर कोणतेही अडथळे अगर बोर्ड न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे .