जागतिक महिला दिनानिमित्त नारी गौरव पुरस्कार वितरण

- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर –

world women’s day in ahmednagar  गुलामगिरीच्या बेडीतून महिला आता मुक्त होत असून सर्व विश्वामध्ये भ्रमण करत आहेत,आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा सर्व दूर उमटवत आहेत,या सर्व गोष्टीची नोंद घेऊन शब्दगंधने महिलांच्या प्रति असलेली कृतज्ञता नारींचा गौरव करून सिद्ध केली आहे असे मत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी व्यक्त केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य व वॉरियर्स फाउंडेशन,अहमदनगर च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती ‘ च्या कविता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन,महिलांचे भावविश्व उघगडविणारे काव्य संमेलन व नारी गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष कवयित्री सौ.ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई या होत्या. तर विचारपिठावर नगरसेवक संपत बारस्कर,प्राचार्य स्वाती दराडे, वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला गोसावी,सौ.किरण बारस्कर,प्राचार्य जी.पी. ढाकणे शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे हे होते.

पुढे बोलताना प्राचार्य गावित म्हणाल्या की,’स्वकर्तुत्वाने पुढे आलेल्या पिढीचा सत्कार होत आहे,ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे’. अध्यक्षपदावरून बोलताना ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई म्हणाल्या की, शब्दगंध चे सर्वच उपक्रम स्तुत्य असे असतात,समाजातील कार्यकर्तृत्ववान महिलांची दखल घेऊन त्यांचा आज सन्मान केला जात आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.

कांद्याचा झाला वांधा !मिळाला एक रुपया

यावेळी उपवन संरक्षक श्रीमती सुवर्णा माने,न्यू आर्ट्स कॉलेजच्या इतिहास विभागातील प्रा.डॉ.मीना साळे,नोबेल हॉस्पिटलच्या डॉ.संगीता कांडेकर,न्युक्लिअस हॉस्पिटलच्या डॉ.चेतना बहुरूपी व वळण च्या उपसरपंच सौ. लीलाबाई गोसावी यांचा नारी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सुरुवातीला नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते वॉरियर्स फाउंडेशनच्या छोट्या बालकांच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. शुभेच्छा देताना ते म्हणाले की, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी महाराष्ट्रीयन संस्कृती चे परिपाठ घ्यायला हवेत,तरच शालेय विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनू शकतील, यावेळी परिसरातील मंदा पोळ, प्रणिता पठारे,स्वाती सोनसळे,मार्गेट पिंटो,अंजली केदारी,वैशाली गाडेयांचा सत्कार करण्यात आला.

ती च्या कविता या काव्यसंग्रहाच्या संपादकीय मंडळातील सदस्य कवयित्री स्वाती ठुबे, विद्या भडके, वंदना चिकटे, संगीता दारकुंडे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या काव्य संमेलनात प्रतिभा बोबे, शालन देशमुख, संजय आहेर, सुनिता सूर्यवंशी,डॉ. हेमलता चौधरी, अलका पवार,शोभा कोकाटे, आत्माराम शेवाळे, ज्ञानदेव उंडे,शर्मिला रूपटक्के, अंजली चव्हाण,ॲड.श्रद्धा जवाद,सुचिता काकडे, प्रशांत वाघ,सुरेखा घोलप,ऋता ठाकूर, ज्योती गोसावी,वर्षा भोईटे, विनायक पवळे,श्रुतिका कानडे यांनी आपल्या कवितांचे वाचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिला गोसावी यांनी केले,सूत्रसंचालन कु.हर्षली गिरी व यज्ञजा गिरी यांनी केले,शेवटी कार्याध्यक्ष प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,भगवान राऊत,बबनराव गिरी,सत्यप्रेम गिरी,जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, वॉरियर्स फाउंडेशनच्या भामा गोसावी,आरती गिरी,संगीता गिरी, अनिता कानडे, बाळासाहेब अमृते,स्मृती घोडेस्वार,वर्षा गुजर,आर्या गुजर, ऋषिकेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles