टंचाईग्रस्त गांवानी पाण्यासाठी प्रस्ताव तात्काळ दाखल करावेत
पाथर्डी दि 12 मे प्रतिनिधी
तालुक्यात काही भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. टंचाईग्रस्त गावातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळणेसाठी प्रस्ताव तात्काळ पंचायत समिती कार्यालयाकडे जमा करावीत.असे आवाहन पंचायत समिती सभापती सुनीता गोकुळ दौंड यांनी केले आहे.
सदयस्थितीमध्ये सर्व ग्रामसेवक यांनी गावामधील कारोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील वाडी वस्तीवर पाहणी करून त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल अथवा आठ दिवसामध्ये पिण्याचे पाण्याची पातळी कमी होऊन टंचाई निर्माण होणार आहे. त्या ठिकाणासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होणेसाठी टॅकर मंजुरी प्रस्ताव परिपूर्ण तयार करून पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावा.असे दौंड यांनी सूचना केल्या आहेत. संबंधित गावातील ग्रामसेवकांनी टंचाईचे काळात पिण्याच्या पाण्याच्या संबंधित टंचाई उदभवल्यास त्यास ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक यांना जबाबदार धरण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर आपल्या भागातील पाण्याच्या परिस्थितीची पाहणी करून प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात यावा.
कोरोनाच्या भीषण संकटांत पिण्याची पाण्याची अडचण आपल्याकडून ग्रामीण जनतेची होता काम नाही, याची दक्षता सर्वांचीच घ्यावी.गाव,वाडी आणि वस्तीवरील पाण्याची समस्या जाणवत असेल तर तात्काळ पंचायत समिती प्रशासन अथवा पंचायत समितीचे सभापती,उपसभापती सदस्यांकडे संपर्क साधा असे ही आवाहन दौंड यांनी केले.
Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटकbio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश