अवैध दारूविक्री अकोले राजूर रडार वर

अहमदनगर  , ता.१७: –

  कोरोना असतानाही अकोले शहरातून संगमनेर च्या दिशेने जाताना ताजणे पेट्रोल पंपासमोर अवैध दारूविक्री करताना विलास विठ्ठल कवडे (कळस),अण्णा दामु गुंजाळ (कवठे धांदरफळ)  या दोघांना अकोले पोलिसांनी पकडून गुन्हा दाखल केला आहे.

तर राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत व्यवसायिक   तडीपार असल्यामुळे एक वर्षे बंद असणारा व्यवसाय  राहुल नगर येथे  राहुल अदालत नाथ शुक्ला  संजय अदालतनाथ  शुक्ला, यांचेवर गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी राहुल यास अटक केली तर संजय फरार आहे . कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी नरेंद्र साबळे आल्यापासून अवैध दारूविक्री मोडीत काढल्याने  राजूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .  

    याबाबत अकोले पोलिस स्टेशनचे हवालदार सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे कि अकोलेतुन संगमनेर कडे जाणाऱ्या रस्त्यावर ताजणे पेट्रोल पंपाजवळ बजाज सी.टी.१०० क्र एम.एच.०७ सी.के.६०८९ या गाडीवर  आरोपी विलास विठ्ठल कवडे व अण्णा दामु गुंजाळ हे बॅग पाईपर व्हिस्की कंपनीच्या १८० मि.ली.च्या ४० बाटल्या हा विनापरवाना बेकायदा गुन्ह्याचा माल बाळगताना आणि अवैध दारूविक्री करताना आढळुन आल्याने त्याचे विरूद्ध गु.र.न.१११/२०२१ भा.द.वि.कलम ६५ ई ८३ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपास पो.ना.तळपे करत आहे.राजूर पोलीस हद्दीत सहायक पोलीस निरीक्ष नरेंद्र साबळे याना गुप्त बातमीदारांमार्फत राहुल शुक्ला  व संजय शुक्ला अवैद्य दारूची विक्री करत असल्याचे समजल्याने सपोनि साबळे , सहायक फौजदार नितीन खैरनार , पो. कॉ . रवींद्र थोरात , गाढे , काळे , मुळाणे, वाडेकर, चोखण्डे, आदींनी धाड टाकली असता व घराची झडती घेतली त्यावेळी १२४८० रुप्याचे संत्रा कंपनीचे देशी दारूचे ५ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये १८० मुलीच्या ४८ सीलबंद बाटल्या मिळून आल्या राहुल शुक्ला यास अटक केली मात्र त्याचा भाऊ संजय शुक्ला फरार होण्यास यशस्वी झाला त्याचे विरोधात गु.र.न. ५६/२०२१ भा. द. वि कलाम    ६५ ई ८३ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. तपस पोलीस नाईक डि. . के . भडकवाड करत आहे .

सपोनि नरेंद्र साबळे याना सामाजिक कार्यकर्त्यांनी धन्यवाद दिले आहेत

सरकारच्या आदेशानुसार सध्या दारूची दुकाने बंद ठेवली आहेत.पण अकोल्याच्या स्मशानभूमीत दारू विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केली आहे.स्मशानभूमी ते उदासी आश्रम या परिसरात शेतात दारूचे खोके ठेऊन विक्री सुरू आहे. अनेक मद्यपी तिथे गर्दी करत आहेत अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत.तेथे गांजा विक्री सुरू आहे.या दारूच्या बाटल्या कोणत्या दुकानाच्या स्टॉकमधील आहेत याची तपासणी करून त्या संबंधित दुकानावर कारवाई करावी. याच दुकानातून अगस्ति चित्रपटगृह परिसरातही एका घरातून विक्री होत आहे. याकडे कृपया लक्ष द्यावे तसेच राजूर येथेही कडक कारवाई करावी अशी  ही विनंती   दारू बंदी चळवळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे .  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles