पुणे मेट्रो व्यवस्थापिकीय संचालक बिर्जेश दीक्षित पत्रकार परिषद
पुणे,
underground pune metro पुण्यातील सिव्हिल कोर्ट पुणे मेट्रो कार्यालय येथे पुणे मेट्रो चे व्यवस्थापिकीय संचालक ब्रिजेश दीक्षित पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना बरोबर संवाद साधला.
आज पुण्यातील रेंझ हिल येथे मेट्रो चा पहिल्या रेक मध्ये तीन डबे पोहोचले , रेंज हिल ते स्वारगेट भुयारी मार्गाची चाचणी आम्ही लवकरच घेणार आहे.रेंजहिल येथे सर्व पुणे मेट्रो च्या कंट्रोल रूम चे काम सुद्धा पूर्ण झाले आहे अशी माहिती या वेळी दिक्षित यांनी दिली.
भुयारी मेट्रोची चाचणी लवकरच होणार आहे. रेंज हिल ते स्वारगेट या भुयारी मार्गच काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलीय. आज जगभरातील मेट्रो प्रकल्प तोट्यात असले तरी पुण्यातील मेट्रो metro प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाला आलेला असेल. त्यातील रेंज हिल्स स्टेशन तसेच सिव्हील कोर्ट जंक्शनचं काम पुढील 3 महिन्यांत पूर्ण होणार आहे.
पुण्यात १५ ऑगस्टला ८८ हजार पुणेकरांनी मेट्रो प्रवास केला.
निगडी ते सिव्हिल कोर्ट आणि कोथरूड ते सिव्हिल कोर्ट मार्ग पूर्णत्वाकडे
भुयारी underground मार्गवर ट्रायल लवकरच
शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट या भुयारी स्टेशनच काम अंतिम टप्प्यात
नागपूर मेट्रो विषयी शंका होती, मात्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ९२ हजार नागपूरकरांनी प्रवास केला
मार्च २०२३ पर्यत पुण्यात मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण होतील.
विस्तारित मार्गांचा आराखडा महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवला आहे.
आमदार खासदारांना पेंन्शन मग आम्हांला का नाही?