पंचनाम्याची वाट न बघतां हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी
औरंगाबाद
uddhav thackeray crop damage visit परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादचा Thackeray’s first tour दौरा केला.
गंगापूर तालुक्यातील दहेगाव शिवार व पेंढापूर शिवारात त्यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान loss of crop झाल्याचं सांगत, आपल्या व्यथा मांडल्या. जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. असे म्हणत त्यांच्यात विश्वास बांधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माझ्या दौऱ्यावर काही जणांनी टिका केली, मात्र परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी मी हा प्रतिकात्मक दौरा करत असुन परिस्थिती बघितल्यानंतर व शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने करतो aurangabad uddhav thackeray live असे सांगितले.
तसेच राज्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुक्सान केले आहे, पंचनामे होतील तेव्हा होतील, आधी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने करतो असे त्यांनी सांगितले.
सरकारवर टिका करताना हे सरकार उत्सव मग्न आहे, उत्सव साजरे करा मात्र जनतेला सुखी समाधानी ठेवा असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टिका करताना ज्यांनी स्वतःच घर सोडलं त्याला शेतकऱ्याच घर काय दिसणार, माझ्याशी गद्दारी केली किमान शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. ऐन दिवाळीत सरकारकडे वेळ नाही मात्र शिवसेना सोबत आहे.
महा विकास आघाडी देखील तुमच्या सोबत आहेत. फक्त एक विनंती आहे, आत्महत्येचा मार्ग अवलंब करू नका असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गंगापूर,पेंढापूर,औरंगाबाद,