देवराई जवळील बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -

देवराई जवळील बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

करंजी दि 8 एप्रिल,प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात तिसगाव व करंजी येथे जिलेबीची विक्रीसाठी गेल्या काही दिवसापासून स्थायिक असलेल्या दोन तरुणांचा गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर एक मात्र सुदैवाने वाचला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की तिसगाव व करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झालेले आहेत यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर वय वर्षे 17 राहणार बीड., मनेष देवराबी  बिष्णोई वय 23 राहणार जोधपुर राजस्थान व लादुराव जगन्नाथ पालेवाल राहणार जोधपुर राजस्थान हे तिघे तरुण गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवराई येथील बंधाऱ्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेश या दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर लादूराम मात्र सुदैवाने वाचला .त्याने पटकन महामार्गावर  उभे राहून आरडाओरड करून इतरांना मदत मागितली. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दिलीप राठोड,  सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण ,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी येऊन या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केले.

पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या या दोन तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी युवानेते अनिल पालवे, रामदास माळी, गणेश कारखेले पांडुरंग कारखेले या तरुणाने सहकार्य केले. गेल्या काही दिवसापासून तिसगाव करंजी येथे जिलेबी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणांच्या आठवणीमुळे तिसगाव करंजी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles