*तुळशीराम रोज भोगतोय मरण यातना *

अकोले, ता . ३१ : कोणतेही नियोजन न करता स्लॅब टाकला मात्र तो कोसळून तुळशीराम भांगरे या तरुणाचा अपघात झाला . नि त्याच्या आयुष्यात अंधार आला नि गेली आठ वर्षे तो मरण यातना भोगत असून ऑपरेशनसाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने घरातच तो एक एक दिवस मोजत आहे . पत्नी व आई मजुरीला जाऊन कुटुंब चालवत असून आदिवासी संघटनानी त्याच्यावर  झालेल्या अन्याय्साठी दाद मागण्याचे ठरविले आहे . आदिवासी भाग असलेल्या मवेशी गावात  तुळशीराम भांगरे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे २००९ ला गवंडी कामसुरु  केले .तो कमवत असल्यामुळे त्याचा प्रपंच सुरळीत चालू होता . २०१३ उजाडले नि तुळशीराम च्या  आयुष्यात तो कला दिवस उजाडला . राजूर येथे एका व्यापाऱ्याकडे दुकानाचा स्लॅप चे काम सुरु होते . चिंचवणे येथील कामावरून सोमनाथला राजूरला बोलविण्यात आले . त्यावेळी त्याने आपले काम सोडून राजूरच्या कामावर स्लॅप घोटाईचे काम सुरु केले . मात्र १२ फूट लांबीच्या पड्दिला खालून ज्या प्रमाणात सपोर्ट आवश्यक होता तो दिला गेला नाही . चुकीच्या पद्धतीने तो स्लॅप टाकण्यात आला होता . नि तुळशीराम  उभा असताना अचानक स्लॅप कोसळला नि त्याचा कंबरा वर तो पडून त्यात दाबला गेला . आजूबाजूला आवाज झाल्याने लोक पळत आले त्याला डॉ . लांडे हॉस्पिटल तेथून डॉ . गणोरे रुग्णालय संगमनेर येथे हलविण्यात आले मात्र उपचार यशस्वी झाले नाही कमरेपासून खाली तो पूर्ण अपंग झाला गेली ८ वर्षांपासून घरात नुसता पडून आहे मागे आई वडील , पत्नी दोन मुले असा परिवार आहे . आई पत्नी मजुरीचे काम करून कसाबसा प्रपंच चालवतात ज्यांच्यामुळे अपघात झाला त्या व्यक्तींना याचे काहीच सोयीर सुतक नाही .तुळशीराम  जाग्यावर लघवी , प्रातर्विधी करतात त्याची पत्नी त्याची मनापासून सेवा करते मात्र आपल्याला ऑपरेशन करायचे आहे हे जीवन जगणे मला अशक्य झाले आहे मला मदत करा असे जीवन जगण्यापेक्षा मरण परवडेल असे म्हणत तो हुंदके देत रडतो .ते पाहून आई , वडील , पत्नी , मुलेही रडतात देवाने आमच्यावर हि वेळ का आणली असे म्हणतात  त्याचेआयुष्याचे मोठे नुकसान झाले आहे . मात्र त्याला आधार नसल्याने  जगण्यासाठी धडपड करत आहे .दोन  भाऊ आहेत पण तेही गरिबीत जीवन जगतात ज्या स्लॅप मुळे त्याचे आयुष्यात अंधार आला त्याने तर तोंडच दाखविले नाही . त्यामुळे आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भांगरे , पेसा समितीचे राज्य सरचिटणीस यांनी हा विषय न्यायालय व मानवी हक्क आयोगाच्या दारात नेण्याचा विचार केला आहे .

आणखी वाचा :आदिवासींच्या हितासाठी मधुकर पिचड यांची धडपड प्रेरणादायी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles