टूलकिट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक वर दिल्ली येथे गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -

टूलकिट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक वर दिल्ली येथे गुन्हा दाखल

बीड दि 15 फेब्रुवारी, प्रतिनिधी

दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी बीड येथील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून दिल्ली पोलीस तपासा साठी बीड मध्ये दाखल झाले आहेत.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. त्याच्या आडून हिंसाचार पसरविण्याचे काम होणार असल्याच्या कारणाने दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेल गुन्हा रजिस्टर नंबर  49/2021 कलम 124,153(अ) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंतनू मुळूक हा मूळचा बीडचा आहे. सध्या तो दिल्लीत राहत आहे. गुन्हा दाखल केल्यापासून तो गायब आहे. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बीडमध्ये दाखल झाले असून शंतनू याच्याविषयची अधिक माहिती मिळवत आहेत.
पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. तसेच झूम ऍपवरून या तिघांनी मिटिंग करून अपप्रचार करण्याचे षडयंत्र रचले होते. असा दावा दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. टूलकिटमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलन फोफावण्यासाठी जानेवारीत टूलकिट तयार करण्यात आलं. हे आंदोलन विदेशापर्यंत पोहोचावं आणि परदेशातील भारताच्या दूतावासाला टार्गेट करता यावं म्हणून हा सगळा प्रकार करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा:निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles