जमीन नावे करण्यासाठी मागितली लाच तलाठी acb च्या ट्रॅपमध्ये अडकला
आष्टी दि 2 मार्च ,प्रतिनिधी
तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी याने वाटणीपत्राप्रमाणे शेती नावावर करण्यासाठी 3000 रुपयांची लाच घेताना आष्टी येथील मोराळा सजाच्या तलाठ्याला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.तलाठी बाळू महादेव बनगे वय 51 यांस ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांच्या वाटणीची जमीन नावावर करून देण्यासाठी आणि आई वडिल यांना पगार मिळवून,जमिनीचे अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी तलाठी बाळू बनगे याने केली होती.यासंदर्भात तक्रारदार यांनी 14 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.त्यानुसार तडजोडी अंती ३००० स्विकारण्याचे मान्य केले याप्रकरणी तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी तक्रारादाकडून वाटणीपत्राप्रमाणे शेताची तक्रारदार त्यांचे भाऊ आई वडिल बहिण यांच्या नावे करण्यासाठी तसेच अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले.ही कारवाई आष्टी बसस्थानक येथे सापळा लावून करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक बाळकृृृृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.रविंद्र परदेशी,पोलिस नाईक श्रीराम गिराम,पो शि.भारत गारदे,पो शि संतोष मोरे,यांनी केली. आरोपीला आष्टी पोलीस ठाण्यात हजर केले असून कलम 7 अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
हेही वाचा: कोरोना बधितांची संख्या वाढतेय
[…] […]