श्रीरामपूर,दि 16 फेब्रुवारी, प्रतिनिधी
पन्हाळा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई विभागाने तर मुलींमध्ये पुणे विभागाने विजेतेपद पटकावले.
राज्यातून ८ विभागांनी या ज्युनिअर व्हॉलिबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले.
मुलींच्या गटातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पुण्याने नागपूरवर २५-११,२५-१६ व २५-५ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर संघाने अमरावती संघावर २५-२२,२५-१८ व २५-२१ गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी नागपूर व अमरावती या संघांमध्ये सामना झाला नागपूर संघाने अमरावती वर २८-२६ व २५-२१ गुणाने मात करून तिसरा क्रमांक पटकावला.
ज्युनिअर व्हॉलिबॉल मुलांमध्ये मुंबई विभागाने तर मुलींमध्ये पुणे विभागाने विजेतेपद
मुलांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पुण्या संघाने कोल्हापूरचा रंगतदार सामन्यात २१-२५,२५-२०,१४-२५,२६-२४ व १५-१२ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तर दुसर्या सामन्यात बलाढ्य मुंबई संघाने नाशिक वर २५-२२,२५-१६ व २५-१८ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने नाशिक वर २५-१९ व २५-१७ ने मात करीत तिसरा क्रमांक पटकावला.
अंतिम सामन्यात मुंबई संघाने जोरदार खेळ करत पुण्यास २५-१९,२७-२५ व २५-१७ ने पराभव करीत राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ज्युनिअर व्हॉलिबॉल
या राज्यस्तरीय स्पर्धेतूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा उत्कृष्ट संघ निवडला जाईल अशी माहिती महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री पार्थ दोषी व सचिव श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा:टूलकिट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक यास जामीन मंजूर
[…] […]