राज्य शिक्षक पुरस्कारात नगरचा पुन्हा डंका, जिल्ह्याला 5 पुरस्कार
अहमदनगर
state teacher award 2022 राज्य शिक्षक पुरस्काराची आज राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 5 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे.
राज्यात दिले जाणारे 108 शिक्षक पुरस्कारांची आज राज्य शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आली यामध्ये माध्यम प्राथमिक शिक्षकांसाठी 38 माध्यमिक शिक्षकांसाठी 39 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी 18 थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8 ,थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8, विशेष कला क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक पुरस्कार एक, स्काऊट एक, गाईड एक, अशा 108 पुरस्कारांचा समावेश आहे. या शिक्षकांची निवड एका समितीद्वारे करण्यात आली आहे.या संदर्भात काही महिन्यांपूर्वी आवेदन मागवण्यात आले होते.
प्राथमिक शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील शिक्षक तुकाराम तुळशीराम अडसूळ यांना जाहीर झाला आहे.
माध्यमिक शिक्षकांमधून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नरसिंह विद्यालय चास तालुका पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर येथील श्रीमती स्वाती किशोर अहिरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटे तालुका अकोले अहमदनगर येथील सह शिक्षक दीपक विनायक बोराडे यांना आदिवासी क्षेत्रात पुरस्कार जाहीर झाला आहे .
विशेष शिक्षक या श्रेणीमधील कला क्षेत्रातला पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय करंजी बुद्रुक तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील संदीप दिलीप चव्हाण यांना कला क्षेत्रातला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .
गाईड या क्षेत्रामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील मंगला दादासाहेब साळुंखे यांना गाईड या विभागाचा राज्यशिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींना 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई येथेे कार्यक्रमात पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचं या आदेशात म्हटले आहे.