पोराने झाडल्या बापावर पिस्टल मधून गोळ्या!

- Advertisement -
- Advertisement -

पोराने झाडल्या बापावर पिस्टल मधून गोळ्या! बाप गंभीर !

आष्टी प्रतिनिधी

दारूच्या वादावरून बाप लेकाचे भांडण झाले आणि त्याचे पर्यवसान थेट गोळ्या झाडण्यात झाले.वडिलांच्या पिस्टल मधून पोराने बापावर गोळ्या झाडल्या.
ही घटना आष्टीतील विनायकनगर भागात सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाला. आणि मुलानेच बापावर तीन गोळ्या झाडल्या. या मध्ये मुलाचे वडील गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष किसन लटपटे (वय-50) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (वय-24) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते,यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरु आहे.

आणखी वाचा:गृह विलगीकरण बंद आता सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

तीन महिन्यापूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्त दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाले .त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता.गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतुनच पोटाच्या मुलाने तीनगोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आईला मारहाण झाल्याने राग अनावर
किरण लटपटे याने आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की,त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरु केली होती,यानंतर मला राग अनावर झाल्याने आपल्या बंदुकीतूनगोळ्या झाडल्या असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles