शिर्डीतील साईबाबांचे मंदिर झाले सोन्याचे !!!

- Advertisement -
- Advertisement -

शिर्डी,

shirdi saibaba temple becomes golden  शिर्डी तील साईबाबांचे मंदिर आता संपूर्ण सुवर्णमय झाले आहे. साईबाबांना देणगी देणाऱ्या देणगीदारांच्या माध्यमातून साईबाबांच्या समाधी सह कळसाच्या भाग सुवर्णमय करण्यात आला आहे. यासाठी हे काम 2006 पासून सुरु आहे. आता हे काम पूर्णत्वास गेले आहे.
देणगीदार साईभक्‍त श्री. बी. विजयकुमार व सौ. सी. वनजा हैद्राबाद यांचे देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदीराच्‍या कळसाचे आतील बाजुस सुवर्ण वज्रलेपाचे ( मुलामा ) काम पुर्ण झाल्याने आज श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी त्‍यांचा श्री साईबाबांची मुर्ती व विभुती देऊन सत्‍कार केला.

shirdi saibaba temple becomes golden 
shirdi saibaba temple becomes golden

देणगीदार साईभक्‍त बी. विजयकुमार यांनी सन-२००७ मध्‍ये saibaba temple  समाधी मंदीरावरील कळस व त्‍याभोवताली असलेले चार गोपुर यांनाही सुवर्ण मुलामा देण्‍याचे काम देणगीस्‍वरुपात केलेले आहे. यावर आता पुन्‍हा एक थर सुवर्ण वज्रलेप करण्‍याचे कामही करण्‍यात आले आहे.

यापुर्वी सन २००६ मध्ये श्रींच्‍या समाधी मंदीरातील सोन्‍याच्‍या पादुका, सोन्‍याची झारी व फुलपात्र, सन २००८ मध्ये सोन्‍याची चिलीम, सन २०१० मध्ये गुरुस्‍थान मं‍दीराचे बाहेरील बाजुस सुवर्ण मुलामा, सन २०१५ मध्ये श्री शनि मंदीर, श्री गणपती मंदीर व श्री महादेव मंदीर या तीनही मंदीराचे कळसांना सुवर्ण मुलामा देण्‍याचे काम देणगीदार बी. विजय कुमार यांचे देणगीतून केलेले आहे.

तसेच मार्च २०२३ मध्ये श्री साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, श्री व्‍दारकामाईचे चांदीचे सिंहासन व समाधी मंदीरातील शोरुमचे सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्‍याचे काम देणगीदार साईभक्‍त बी. विजय कुमार यांचे देणगीतून झालेले आहे. देणगीदार साईभक्‍तांच्‍या विनंतीवरुन देणगी मुल्‍य नमुद केलेले नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles