shahid jawan today news कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील करंजगाव इथले जवान आसाम सीमेवर अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्याची घटना घडली आहे.नितेश महादेव मुळीक ( वय २५ ) असे शहीद जवानाचे नाव आहे.
ही घटना बुधवार (दि. ९) रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती लष्करातील अधिकार्यांेनी वडील महादेव मुळीक यांना फोनद्वारे कळवली.या घटनेमुळे करंजगावसह चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे.
shahid jawan today news आसाम सीमेवर अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद
नितेश आठ वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाला होता. सध्या तो आसाम येथे सेवा बजावत होता. सीमेवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात नितेश बुधवारी सायंकाळी शहिद झाला.
गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. सध्या त्याची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चायत आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
निलेश याचे पार्थिव शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मूळगावी करंजगावात आणले जाणार आहे.तेथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ खाजगी शाळांमधील शिक्षकांना मिळणार