kej
santosh deshmukh murder case beed 302 accused walmik karad mokka सोमवारी सकाळी १० वाजता टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्सयाचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मध्यमांपुढे सांगितले .
३१ डिसेंबर रोजी सीआयडी ने मोठा दावा केला होता. खंडणी आणि खून यांमध्ये कनेक्शन असल्याचा दावा जाहीर केला होता. मात्र आता काही आरोपींना मकोका आणि ३०२ गुन्ह्यात घेतलं जात नाही. हे चुकीच्या पद्धतीने होत आहे.
आपण मोबाईल टावर जाऊन आपल्याला आणि कुटुंबाला संपून घेणार आहे आणि मी गांभीर्यपुर्वक सांगतो, उद्या सोमवारी दि. १३ रोजी मस्जोसाग ( ता. केज ) येथे आंदोलन करणार यात मी, माझा, मुलगा सर्व कुटुंब असणार आहे. उद्या दहा वाजता ते मी करणार आहे, असे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मध्यमांपुढे सांगितले.
santosh deshmukh case धनंजय देशमुख म्हणाले, माझ्या भाऊ खून प्रकरणाला ३३ दिवस लोटले आहे, मला हा प्रश्न वारंवार विचारला जात होता, म्हणजे हे प्रकरण झालं, जी हत्या झाली. त्या दिवशीपासून आणि मी पण तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो की काम चालू आहे. व्यवस्थित चालू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर मोक्का
पण परवा दिवशी रात्री वैभवी न एक व्हिडिओ टाकला होता. ते तुम्ही बघितला असेल की आम्हाला तपासाची माहिती द्या, काय झाले, कोण कोणत्या गोष्टी होत आहेत त्या आम्हाला माहिती होऊ द्या, कुटुंबाला होऊ द्या, गावकऱ्यांना होऊ द्या परंतु कुठल्याही प्रकारची माहिती आतापर्यंत दिली नाही.
काय चालू हे माहित नाही आणि त्यामुळेच मी निर्णय घेतला. जर न्याय मागताना आरोपी शोधत नाहीत, पकडलेले आरोपीवर सगळ्यांवर सारखे गुन्हे नोंद होत नाहीत तर मग आपण निर्णय घेतला पाहिजे, काही निर्णय घेतला नाही तर ते मलाही मारतील म्हणून स्वतः आपण मोबाईल टावर जाऊन आपल्याला आणि कुटुंबाला संपून घेणार आहे आणि मी गांभीर्यपुर्वक सांगतो.