सदर समितीने गोपनीय अहवाल मा. उच्च न्यायालयात ३०/११/२०२४ पर्यंत सादर करण्याचे आदेश.
सदर समितीचे अध्यक्ष निवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य असतील.
कोपरगाव
Saibaba Temple Security CRPF/CISF येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी साईबाबा मंदिर व परिसर, शिर्डी यांची सुरक्षा, केंद्रीय पोलीस राखीव बळ (CRPF) किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा बळ (CISF) यांच्या मार्फत देण्यात यावी यासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.
सदर जनहित याचिका मध्ये असे नमूद आहे कि, विविध पोलीस अधिकारी व साईबाबा संस्थान च्या विश्वस्त यांनी वेळोवेळी मंदिर सुरक्षा केंद्रीय पोलीस राखीव बळ (CRPF) किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा बळ (CISF) यांच्या मार्फत देण्यात यावी यांसाठी विविध स्तरावर पाठपुरावा केले आहे पण आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढत आहे तसेच साईभक्तांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज आहे.
*सदर बाब लक्षात घेता मा. उच्च न्यायालयाने मा. प्रबंधक, उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश, यांना आंध्र प्रदेशस्थित तिरुपती बालाजी देवस्थान येथे तैनात असलेल्या सुरक्षा व्यवस्था संदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार मा. प्रबंधक उच्च न्यायालय आंध्र प्रदेश यांनी गोपनीय अहवाल द्वारे तिरुपती देवस्थान मध्ये असलेल्या सुरक्षा संदर्भात माहिती सादर केली.मा. न्यायालयाने, प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवाला मधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात विचार करणे गरजेचे आहे असे निरीक्षण नोंदवले आहे.*
मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर व्ही घुगे व मा. न्या. आर. एम. जोशी यांनी साईबाबा मंदिर सुरक्षा संदर्भात ७ सदस्यांची समिती ३१/०७/२०२४ पर्यंत गठीत करण्याचे राज्य शासनास आदेश केले आहे.
*सदर समितीने सध्याची मंदिर सुरक्षा पडताळणी करून केंद्रीय पोलीस राखीव बळ (CRPF) किंवा केंद्रीय औद्योकीय सुरक्षा बळ (CISF) मंदिर परिसर, मंदिर गाभारा इ. ठिकाणी नेमावी का कसे, तसेच CISF किंवा CRPF किंवा SRPF यांच्यातील संयोजन करता येईल का कसे या बद्दल शिफारस / सूचना चा गोपनीय अहवाल मा. उच्च न्यायालयात ३०/११/२०२४ पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले.*
दरम्यान पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकारी ने मंदिर परिसर २ महिन्यात एकदा तरी भेट देऊन मंदिर सुरक्षा चा आढावा घ्यावा असे देखील आदेश पारित केले आहे.
*कोण असणार समिती सदस्यः*
*१. निवृत्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य- समिती अध्यक्ष*
*२. निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य किंवा निवृत्त संचालक, सि बी आय (महाराष्ट्र कॅडर मधील)*
*३. प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर,*
*४. जिल्हाधिकारी, अहमदनगर*
*५. पोलीस अधीक्षक, अहमदनगर*
*६. संजय भास्करराव काळे, याचिकाकर्ते*
*७. मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी- समिती सचिव.*
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे तर शासनाच्या वतीने ऍड अमरजित गिरासे, संस्थान च्या वतीने ऍड संजय मुंढे काम पाहत आहे.**पुढील सुनावणी १३. १२. २०२४ रोजी ४.३० वाजता ठेवली आहे.