थोरामोठ्यांच्या सत्काराने झाला प्रजासत्ताक दिन साजरा
बीड दि 26 जानेवारी ,प्रतिनिधी
बीड येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
बीड येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याने त्यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार झाला, तसच स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळालेल्या चार ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी धनंजय मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यात झालेल्या विकास कामांची माहीती दिली.
याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलिस अधिक्षक आर. राजा , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीक यांची भेट घेऊन पालक मंत्री श्री मुंडे यांनी सदिच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर.राजा यांचा राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याने सत्कार करण्यात आला तसेच विभागीय स्तर स्वच्छता पूरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक, आणि उल्लेखनीय गुणवत्ता पूर्ण कामगिरी करणार्या विद्यार्थी विद्यार्थिनी, पोलिस, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा यांचा प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हेही वाचा:कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटोचे बनले कॅव्हलरी शिल्प;नगरच्या वैभवात भर