बीड
रेमेडिसीवीयर इंजेक्शन आणण्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बीडला जावे लागत होते.पण आता ही चिंता दूर झाली असून तहसीलदार यांच्या मार्फत हे इंजेक्शन तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहेत.
यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांना बीड मुख्यालय येऊन आयटीआय येथे रांगेत उभे राहावे लागत होते.बीड येथे जाण्यासाठी माजलगाव, आष्टी,अंबाजोगाई, परळी येथून रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी रांगेत उभे राहत होते. आता त्यांना दिलासा मिळाला आहे.
रेमेडिसीवीयर इंजेक्शन कसे मिळणार
सर्व तहसीलदार त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्रातील खाजगी कोविंड हॉस्पिटल मध्ये भरती असलेले रुग्णांना ,जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमेडिसीवीयरइंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली असल्यास, आपले स्तरावर त्यांची यादी करून मेलवर निवासी उपजिल्हाधिकारी यांना पाठवतील .
यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी फिजिशियन यांनी रेमेडिसीवीयरइंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस घेऊन तहसीलदार यांचे कडे नोंदणी करण्याची आवश्यकता आहे,अथवा संबंधित दवाखाण्याने रुग्णांची शिफारस तहसीलदार यांचे कडे केल्यास ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. असे उपजिल्हाधिकारी बीड यांनी कळविले आहे.
बीड पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत आष्टी येथे जनता दरबार