सहा रेमेडिसीवीयर इंजेक्शन काळाबाजार करणारी टोळी पकडली.

- Advertisement -
- Advertisement -

सहा रेमेडिसीवीयर इंजेक्शन सह काळाबाजार करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली.

अहमदनगर दि 10 मे प्रतिनिधी

रुग्णांच्या नातेवाईकांना शोधून त्यांना
रेमेडिसीवीयर हे इंजेक्शन जास्त भावाने विकणाऱ्या डोक्यातील टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. साखळी पद्धतीने होत असलेल्या रेमेडिसीवीयर इंजेक्शनचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला आहे. या कारवाईत विविध गावातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.त्यांच्याकडून सहा इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे एक व्यक्ती रेमेडिसीवीयर हे इंजेक्शन जास्त भावाने विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि औषध प्रशासन विभाग आणि एकत्रित येऊन सापळा रचला. यामध्ये वडाळा बहिरोबा येथे रामहरी बाळासाहेब घोडेचोर राहणार देसवडे आणि आनंद पुंजाराम खोटे राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रेमेडिसीवीयर इंजेक्शन जप्त करण्यात आले.

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या
रेमेडिसीवीयर इंजेक्शन कोठून आणले याची चौकशी केली असता शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या तपासात देवटाकळी येथील एक कांगोणी रोड खरवंडी तालुका नेवासा येथील एक जण अशा दोघांना ताब्यात घेतले.या सर्वांनी वडाळा बहिरोबा येथील राकेश हेमंत मंडल यांच्याकडून हे रेमेडिसीवीयर इंजेक्शन घेतल्याचे स्पष्ट झाले.त्याच्या शोध घेतला असता त्याची गाडी सियाझ नेवासा फाटा येथे आढळून आली.आणि तो फरार झाला.त्याच्या गाडीतील डॅश बोर्ड मधून एक रेमेडिसीवीयर जप्त करण्यात आले.

पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.अटक केलेल्या आरोपी मध्ये रामहरी बाळासाहेब घोडेचोर राहणार देसवडे तालुका नेवासा, आनंद कुंजाराम थोटे राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव,पंकज गोरक्षनाथ खरड देव टाकळी ,सागर तुकाराम हंडे कान्गुनी रोड खरवंडी तालुका नेवासा यांचा समावेश आहे.आरोपी राकेश हेमंत मंडल हा फरार आहे.या सर्व आरोपी विरुद्ध औषध निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादी नुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आणखी वाचा:तालुक्याबाहेरील नागरिकांना लस देऊ नये यासाठी भाजपचे आंदोलन

हे सर्व आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते आणि गरजू नातेवाईकांचा शोध घ्यायचा आणि त्या व्यक्तीला जास्त पैशाने रेमेडिसीवीयर इंजेक्शनचा पुरवठा करायचा अशा पद्धतीची ही टोळी काम करत होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles