Rashtriya Vayoshri Yojana 2022 देशातील जेष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सशक्त विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांना आवश्यक असलेल्या साधन साहीत्याची निर्मिती सुध्दा देशात सुरू करून केंद्र सरकारने आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाउल पुढे टाकले असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे मंत्री डॉ विरेद्र कुमार यांनी केले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील जेष्ठ नागरीकांना साधन साहीत्याचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री डाॅ विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील आ.मोनिका राजळे खा.डॉ सुजय विखे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे भाजपाचे भैय्या गंधे माजी महापौर बबाबासाहेब वाकळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
Rashtriya Vayoshri Yojana 2022 ८९५ पात्र लाभार्थींना आज साहीत्य वितरीत
नगर जिल्ह्य़ातील ३७ हजार जेष्ठ नागरीकांना सुमारे ३७ कोटी ९५ लाख रुपयांचे साधन साहीत्य केंद्र सरकारच्या वतीने मोफत देण्यात आले आहैत.यासाठी नगर जिल्ह्य़ात तालुकास्तरावर १४ कॅम्पचे नियोजन करण्यात आले होते.यातील ८९५ पात्र लाभार्थींना आज साहीत्य वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री डाॅ विरेंद्र कुमार म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू झाली.आता आणखी एक पाउल पुढे टाकून दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आज देश आत्मनिर्भरतेने पुढे जात असताना दिव्यांग व्यक्तीनाही आत्मविश्वास मिळावा यासाठी बोलता न येणाऱ्या शून्य ते पाच या वयोगटातील मुलांची प्लॅन्ट सर्जरी सुध्दा आपण देशात करणे सुरू केली.सहा लाखांचा संपूर्ण खर्चही सरकरच करीत असल्याची माहीती देवून विरेंद्रकुमार म्हणाले की, दिव्यांग सशक्त विभागाच्या माध्यमातून आता या व्यक्तीमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कर्ज योजना सुरू केली असून या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आशी योजना तयार करण्यात आल्याचे सांगितले.
दिव्यांग व्यक्तीना यापुर्वी सर्व साधन ही परदेशातून मागवावी लागत होती.महागड्या किंमतीच्या या वस्तू घेणे मुश्कील होते म्हणूनच आपल्या विभागाने ही साधने देशातच उत्पादीत करण्याचा निर्णय घेतला.यातून देशाचे आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाउल पुढे पडले असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
साहित्यिक उपक्रमांनी atm साहित्य संमेलन संपन्न
खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदीचे सरकार हे गरीबांचे सरकार असल्याचा संदेश या योजनेतून मिळाला आहे.आतापर्यत जिल्ह्यात ३७ हजार नागरीकांना या योजनेचा लाभ मिळाला.येणाऱ्या काळात एक लाखापर्यत या योजनेचा लाभ मिळवू देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.राजकारण विरहीत सामाजिक कामाला विखे पाटील परीवाराने नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी या योजनेतील एल्मिको या सहभागी कंपनीचे अधिकारी यांनी नियोजनपूर्वक साहीत्याचे वितरण प्रात्यक्षिकासह केले.कार्यक्रमास जेष्ठ नागरीकांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.