आता आष्टी अहमदनगर पुणे रेल्वे प्रवासाचे स्वप्न होणार साकार

- Advertisement -
- Advertisement -

आता आष्टी अहमदनगर पुणे रेल्वे प्रवासाचे स्वप्न होणार साकार

नगर,

नगर वरून पुण्याला जाणारी रेल्वे असावी आणि pune to ahmednagar train असावी अशी अनेक वर्षापासूनची नागरिकांची मागणी आहे.आता काही दिवसात या बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.या संदर्भात रेल्वे प्रवासी सेवा समितीचेआणि राज्यसभेचे खासदारडॉक्टर राजेंद्र फडके यांनी लवकरच ही मागणी पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

 

रेल्वे बोर्डाच्या अखिल प्रवाशी सेवा सुविधा कमिटी ने आज अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केली.तसेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार डॉ राजेंद्र फडके जळगाव, कैलास वर्मा, मुंबई, के रवीचंद्रन चेन्नई , गिरीश राजघोर यांचा समावेश आहे. ashti nagar pune नगर आष्टी रेल्वे मार्गाची माहिती घेऊन ahmednagar from pune या संदर्भात ही रेल्वे पुढे घेऊन जाता येईल का यासंदर्भात चर्चा केली.

या समितीने सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. अहमदनगर येथे या समितीने रेल्वे स्टेशनची पाहणी केली त्यामध्ये रेल्वे स्थानकावरील कॅन्टीनची व्यवस्था,तसेच नागरिकांना बसण्यासाठी ची व्यवस्था , पाण्याची सुविधा यांची पाहणी करत नागरिकांच्या सूचना जाणून घेण्याचा या समितीने प्रयत्न केला.

यावेळी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक नरेंद्रसिंह तोमर,सहाय्यक मंडल वाणिज्य प्रबंधक हर्षद बिशनोई ,यांच्यासह भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, रेल्वे सल्लागार बोर्डाचे सल्लागार अनिल सबलोक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ राजेंद्र फडके यांनी सांगितले कीअहमदनगर पुणे यासाठी येथील नागरिकांनी नवीन रेल्वे गाडीची मागणी केली आहे.तसेच पुणे लखनऊ, दरभंगा या भागात जाणाऱ्या पुण्यावरून सुटणाऱ्या गाड्यांना अहमदनगर pune to ahmednagar मध्ये थांबा द्यावा या साठीची नागरिकांनी मागणी केली आहे.

आष्टी नगर या मार्गावर सुरू झालेली डेम्यू रेल्वे गाडी पुण्यापर्यंत नेण्यासाठी सल्लागार समितीत मांडणार असल्याचे डॉ फडके यांनी सांगितले.तसेच कोरोना काळात बंद झालेल्या तीन रेल्वे पुन्हा सुरु करणार असल्याचे सांगून सोलापूर रेल्वे विभागाचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe

Latest Articles