पुणे दि 26 फेब्रुवारी, प्रतिनिधी
परळी येथील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुण्यातील लष्कर कोर्टात लीगल जस्टीस सोसायटी तर्फे खाजगी खटला दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात लीगल जस्टीस सोसायटी तर्फे भक्ती राजेंद्र पांढरे यांनी हा खटला दाखल करण्यात आला आहे.
परळी येथील युवती पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी हेवन पार्क महमदवाडी येथे अज्ञात कारणाने मृत्यू झाला. पूजा हिचा मृत्यू हा संशयास्पद आणि अनैसर्गिक असल्याने तिच्या मृत्यूचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे या खटल्यात म्हटले आहे. पूजा हिचा मृतदेह पार्किंग मध्ये पडलेला आढळून आला आहे.या मृत्यूबाबत समाज माध्यमांवर मोठ्या व्यक्तींचे नावे येत आहेत.सदरचा मृत्यू संशयास्पद असल्याने सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास मृत्यू बाबतचे पुरावे हे आरोपीद्वारा नष्ट करण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करून तपास होणे आवश्यक असण्याने न्यायालयाचे आदेश होणे आवश्यक असल्याचे या खटल्यात म्हटले आहे.
पूजा हिच्या मृत्यूसंदर्भात लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अड विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत तक्रारही दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचे यामध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा:अफूचा वास पोलिसांना आला अन.शेतकरी जाळ्यात अडकला