उद्यापासून जिल्ह्यात महाऊर्जेच्या ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ महोत्सवास सुरूवात
अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व, संवर्धन व बचत यांचा प्रचार -प्रसार विषयी उपक्रम
अहमदनगर
pradhanmantri solar panel yojna केंद्र सरकारच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य : ऊर्जा @२४×७’ महोत्सव व ‘ उज्ज्वला दिवस’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) च्या अहमदनगर कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेचे महत्व, ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत कार्यक्रमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप( pradhanmantri solar panel yojna )योजनेविषयी जनजागृती केली जाणार आहे. अशी माहिती महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक विजयकुमार उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अपारंपरिक ऊर्जेत मुख्यत्वे पवन ऊर्जा, सौरऊर्जा, बायोगॅस, कृषी अवशेष, ऊसाच्या चिपाडापासून सहवीजनिर्मिती समुद्राच्या लाटापासून आणि भुगर्भिय औष्णिक ऊर्जा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात निरनिराळ्या अपांरपरिक ऊर्जास्त्रोताव्दारे एकूण १३.७५० मेगावॅट एवढे क्षमतेची वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याकरीता वाव आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण १०७७८.२३८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहे. पवनऊर्जा, सौरऊर्जा, लघुजल विदयुतनिर्मिती व ऊर्जासंवर्धन( pradhanmantri solar panels yojna )
या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असलेले राज्य आहे. महाऊर्जाची अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मितीच्या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
voter aadhar linking मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी १ ऑगस्टपासून विशेष मोहीम
अपांरपरिक ऊर्जास्त्रोताच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे दिवसेंदिवस वाढणारे महत्व लक्षात घेता केंद्र शासनाने २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट एवढ्या वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यातील १०० गीगावॅट ऊर्जा ही सौर ऊर्जा असेल, या दृष्टीनेच महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जानिर्मितीचे धोरण आणले आहे. महाराष्ट्र हे सौर ऊजानिर्मितीचे धारेण आणणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शासनामार्फत पाणीपुरवठा योजनांकरीता सौरऊर्जा, ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईट, शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अशा अनेक योजना गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. यासोबत ऊर्जा बचत कार्यक्रमामुळे पांरपारिक वीज वापरावर काही प्रमाणात नियंत्रण आणणे शक्य झाले आहे.( pradhanmantri free solar panel yojna is it fake news )
pradhanmantri solar panel yojna प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना –
प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेंतर्गंत जिल्हयातील शेतकऱ्यांना ३एचपी, ५एचपी व ७.५एचपी क्षमतचे सौर पंप अनुदानावर देण्याची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होतील.
सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेततळे, विहीर, नदीनाले तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोतांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करुन देण्यात येतील. २.५ एकर शेतजमीन धारकास ३ एचपी, ५ एकरपर्यंत शेतजमीन धारकास ५ एचपी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जा संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज करावा. असे आवाहन श्री.उगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.