- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
तिसगाव,
पोळा (pongal) हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण. तसा तो इतर राज्यातही साजरा केला जातो. मात्र पोळा सणाच्या विविध रीतीरीवाजामुळे तो वेगळा वाटतो. साउथ इंडिया मध्ये त्याला pongal नावाने संबोधले जाते.
श्रावण महिना आला कि शेतकऱ्यांना बैल पोळ्याचे वेध लागतात. पोळा हा श्रावणाच्या शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या.
पोळा pongal हा बैलांची काळजी घेण्याचा दिवस. आता कोरोनाच्या स्थिती मुळे सर्व जण आपल्या कुटुंबियांची काळजी घेतात तसे ते आपल्या प्रांण्यांचीही घेतात. मुक्या प्राण्यांप्रती असलेली काळजी दाखविण्याचे काम या दिवशी केले जाते. कारण ते प्राणी वर्षभर कष्ट करून आपल्या मालकाची सेवा करत असतो. एकमेकांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
पोळा pongal साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धती आहेत.
महाराष्ट्रात या पोळ्याच्या पूर्वी शेतकरी बैलाची सजावट करण्यापासून त्याची काळजी घेण्यापर्यंत शेतकरी आसुसलेला असतो.त्याच्या बैलावरच्या नितांत प्रेमामुळे .तो त्याची काळजी घेतो .या पोळ्याच्या सणाचे महत्व एका दिवसापुरते असले तरी त्याच्या आरोग्यसंबंधी काळ्जीतून.
अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील करडवाडी परिसरातील देवाला प्रतिकात्मक बैल वाहण्याची प्रथा रूढ झाली आहे.
आजही या परिसरातील शेतकरी आपल्या बैलाच्या आरोग्यासाठी लाकडी बैल तयार करून देवाला वाहतात. त्यामुळे या देवाला बैलांचा देव असे संबोधले जाते.हे काम पोळ्याच्या अगोदरपासून सुरु असते. त्यासाठी शेतकरी सुताराकडून बैल तयार करून घेत असे.
पोळ्याच्या सणाच्या अगोदरपासून सुतार काम करणारे व्यक्ती हे लाकडी बैल तयार करत असत.
आणखी वाचा :प्रथमच पात्र ठरलेल्या भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी
शिरापुर पासून तीन किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगरात या देवाचे वास्तव्य आहे .
या डोंगर रांगात बौद्ध लेण्याही पहावयास मिळतात. या लेण्यांना येथील स्थानिक लोक सटवाईचा दरा म्हणून ओळखतात.उंच डोंगर आणि कापलेल्या कड्यामध्ये हीं दरी आहे.या दरीकडे जाताना या देवाचे दर्शन होते.या देवाचे दुसरे नाव ‘तारकोबा’ म्हणजेच तारकेश्वर असेही म्हटले जाते .
दगडी चौथऱ्यावर या देवाला वाहण्यात आलेली लाकडी बैल जवळ गेल्यास नजरेस पडतात.सहज कुतूहलाने या बैलांना निहाळल्यास अत्यंत जुन्या काळापासून बैल वाहण्याची प्रथा असल्याचे दिसते.
याबाबत येथील शेतकऱ्यांनी सांगितले कि,आमच्या जनावरांच्या काळजी पोटी आम्ही लाकडी बैल तयार करून या देवाला वाहतो.
या मागील शेतकऱ्यांची धारणा अशी आहे कि,”आपल्याकडे असलेल्या दूध दुभत्या जनावरांना तसेच बैलांना कोणताही रोग होऊ नये आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या श्रद्धेतून देवाला बैल वाहतात”,एवढेच नव्हेतर घरातील गाय किंवा म्हैस व्याली तर तिचे पहिले कोवळे दूध,तूप देवाला वाहण्याची प्रथा आहे .हे सर्व अमावस्या किंवा पोर्णिमा या दिवशी केले जाते.तर इतर दिवशी या परिसरातील शेतकरी या देवाला जातात.
पुरातन दगडाच्या चौथऱ्यावर नंदीचे शीर तोडून उरलेले धड देवाजवळ ठेवलेले आहे .तर दगडी दिवा या ठिकाणी तेवत असतो . आपल्या जनावरासंबंधी नवस या ठिकाणी बोलले जातात आणि ते पूर्ण केले जातात .त्यामुळे बैलांचा देव या भागातील लोकांचा देव आहे .
आधुनिक काळात बैल पोळा pongal साजरा करताना या जुन्या परंपरा येथील शेतकऱ्यांनी जतन करून ठेवल्या आहेत .त्यांच्या श्रद्धेपोटी त्यामुळे याचे आपणास नवल वाटायला नको.
आणखी वाचा :- करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ
- Advertisement -