pm modi dehu पंतप्रधानांनी पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले

- Advertisement -
- Advertisement -

 

 

pune

pm modi dehu 17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी pm modi visit schedule यांनी आज राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याजवळील modi in pune today देहू येथे संत तुकारामांचे दर्शन घेतले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांचे आदर्श अनेक लोकांना प्रेरणा देतात आणि आपल्याला इतरांची सेवा करण्यासाठी तसेच दयाभावाने भरलेल्या समाजाची जोपासना करण्यासाठी प्रेरित करतात.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “संत तुकाराम यांचे आदर्श विचार अनेक लोकांना प्रेरणा देतात. तुकाराम महाराज आपल्याला इतरांची सेवा करण्यासाठी आणि दयाभावाने भरलेल्या समाजाची जोपासना करण्यासाठी प्रेरित करतात.”

 

 

विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून 13 दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित pm modi inaugurates करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.

pm modi dehu

pm modi dehu
pm modi dehu

या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी modi live today केले.

 

पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा टाळले?

 

17 व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्यांच्या साहित्यकृतींनी मध्यवर्ती स्थान मिळविलेले आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू हे या संतकवीचे जन्मस्थान आहे.

pm modi dehu
pm modi dehu

दरम्यान, केंद्र सरकारने, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग यांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पायाभूत सुविधांच्या अद्यायावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. पंढरपूरच्या यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांना या रस्त्यांवरून सुलभपणे मार्गक्रमण करता यावे या उद्देशाने महामार्गाच्या लगत समर्पित पदपथ बांधण्यात येत आहेत.

 

वात्सल्य योजना 2022,संजय गांधी निराधार सह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थीना लाभ वितरण

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles