ॲग्री इंडिया हॅकॅथॉनमध्ये फुले रोबोला एक लाख रुपयाचे बक्षीस

- Advertisement -
- Advertisement -

 

राहुरी, दि. ८ मार्च, २०२१

केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, पुसा, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अंग्री इंडिया हॅकॅथॉन २०२० आयोजन केले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिककृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे सदस्य डॉ. सचिन नलावडे यांनी सादर केलेल्या फुले रोबो काटेकोर पीक संरक्षणासाठी रिमोट संचलित छोटेखानी स्वयंचलित यंत्राला रु. एक लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत इन्क्युबेशन, तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करणे व त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करण्यासाठी रु. ५ ते २५ लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी पात्र ठरला आहे.
अॅग्री इंडिया हॅकॅथॉन २०२० ची सुरुवात दि. २० डिसेंबर, २०२० ला झाली होती. हॅकॅथॉन २०२० वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेण्यात आले तसेच पाच प्रमुख संकल्पनांच्या आधारे संपूर्ण भारतातून अर्ज
मागविण्यात आले होते. ॲग्री इंडिया मीट या संकल्पनेतून विविध विषय तज्ञांचे ऑनलाईन व्याख्यान व संभाषण स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. हॅकॅथॉनसाठी ६००० पेक्षा जास्त प्रकल्पांनी सहभाग नोंदविला होता.
हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र या
हॅकॅथॉनसाठी ५ प्रकल्पांची नोंदणी केली होती. यामध्ये प्राध्यापक, संशोधक सहयोगी व पी.एच.डी
विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नोंदणी केलेल्या ६००० प्रकल्पांपैकी ३०० प्रकल्पांची निवड पुढील टप्यांसाठी
करण्यात आली. ‘फुले रोबो’, रोबोटीक हावेस्टर आणि व्हेरीयबल रेट फल्टीराझल अॅप्लीकेटर या तीन
प्रकल्पांची पुढील टप्पासाठी निवड झाली. या टप्प्यामध्ये ऑनलाईन सादरीकरण तीन दिवस घेण्यात आले.
यामध्ये तीन तज्ञांनी स्पर्धकांना व्यावसायिक मार्गदर्शन तसेच त्यांचे मुल्यामापन केले. ३०० प्रकल्पांपैकी
६० प्रकल्पांची महा अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. ‘फुले रोबो’ हा प्रकल्प पहिल्या ६०
प्रकल्पांमधे महा अंतिम फेरीसाठी निवडला गेला.
महा अंतिम फेरीची स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. निवडलेल्या ६० स्पर्धकांनी ऑनलाईन
सादरीकरण जुरीना केले. यामध्ये डॉ. व्ही.के. तिवारी, डायरेक्टर, आय.आय.टी., खरगपूर यांचे
अध्यक्षतेखाली लपाच जुरींनी स्पर्धकांचे मूल्यमापन केले. तंत्रज्ञानाची/नाविण्याची गरज, योग्यता,
उपयोगिता, बाजारातील त्याची गरज या सर्व बाबींवर तज्ञांनी स्पर्धकांना प्रश्न विचारुन सखोल विश्लेषण
आणि परिक्षण केले. ‘फुले रोबो’ हा फळबागेसाठी विकसीत करण्यात आला आहे. सन २०२० हे कोरोना
बरोबरच बदलत्या हवामानाचे सुचक म्हणुन ओळखले जाईल. या वर्षी पाऊस दोन महिने लांबला.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष व डाळिंब शेतकऱ्यांना फवारणी करणे फार जिकरीचे झाले होते. यामध्ये
ट्रॅक्टरचलित स्प्रेअर अडकण्याचे प्रमाण खुप होते व अडकलेला ट्रॅक्टर काढण्यासाठी दोन तीन ट्रॅक्टर
एकमेकांना जोडावे लागत होते. त्यामुळे शेतकरी खूप त्रस्त झाले आहे. यावर उपाय म्हणून फुले रोबो
काटेकोर पीक संरक्षणासाठी रिमोट संचलित छोटेखानी स्वयंचलीत हे खास यंत्र बनविण्यात आहे.

Read more :अर्थसंकल्पातून बीड जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीचा वर्षाव!

‘फुले रोबो’ हाबॅटरीवर चालणारा, मनुष्यविरहीत असून तो रिमोट कंट्रोलरच्या सहाय्याने चालविला
जातो. तसेच उतारावर तसेच चिखलात चांगल्या प्रकारे पकड/ट्रॅक्यशन मिळवण्यासाठी रबरी ट्रॅकचा वापर
करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोवरला चालवण्यासाठी बॅटरीचा वापर करण्यात आला असुन त्याचे
अंदाजे वजन १५० किलो असून त्यामध्ये ७० लीटर द्रावणाचा समावेश आहे. यामध्ये सध्या सेन्ट्रीफ्युगल
नोझलचा वापर करण्यात आला असुन त्यामुळे उत्तम प्रकारची फवारणी केली जाते. या रोवरच्या सहाय्याने
वेळेची व शक्तीची बचत होणार आहे व तो चालविणाऱ्या मनुष्याचा हानिकारक रसायनाच्या पासून बचाव
होतो. त्याचबरोबर किटकनाशकांची बचत होते. कमी वजनामुळे जमिनीचे कॉम्पॅक्शन होत नाही.
शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात वरदान ठरेल.
स्प्रेयींग रोवर विकसीत करण्यासाठी कास्ट प्रकल्प व ASAP ॲग्रीटेक LLP नाशिक यांनी मेहनत घेतली. फुले रोबो या प्रकल्पाचे प्रमुख डॉ सचिन नलावडे, सहयोगी संशोधक डॉ. गिरिषकुमार भणगे, इंजि.
योगेश दिघे, इंजि. श्रद्धा वराळे तसेच ASAP ॲग्रीटेकचे कार्यकारी संचालक श्री.अजित खर्जूल व त्यांच्या टिमने विशेष मेहनत घेतली. फुले रोबो प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह-प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, खरेदी अधिकारी डॉ. अतुल अत्रे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधक संचालक डॉ.शरद गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles