परळी
parli vaijnath police station परळी पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता. काल रात्री च्या सुमारास ही घटना घडली. कारण होतं परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये संशयित आरोपी म्हणून आणलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कारण पुढे आले आहे.
परळी पोलिसांकडून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते यातील एक व्यक्ती मयत झाला असून मयत व्यक्तीच्या मुलाने आरोप केला आहे की,”माझ्या वडिलांना व मला परळी पोलिसांनी चौकशीसाठी परळी पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले व चौकशी दरम्यान मला व माझ्या वडिलाला निर्दयीपणे मारहाण करीत विचारपूस करीत होते यामध्ये माझ्या वडिलांचे पोलीस स्टेशन मध्येच पोलीस कस्टडीमध्ये डेट झाली आहे” असे आरोप मयत यांचे नातेवाईक करीत आहेत.
police station in parli vaijnath या व्यक्तीला पोलिसांनी परळी उपजिल्हा रुग्णालय मध्ये आणले. त्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीला मयत घोषित केले.खान झरीन (वय 48 वर्ष राहणार मलिक पुरा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.मयत हा मुस्लिम असल्याने या ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झाले होते. घटनाची माहिती मिळतात जिल्ह्याचे पोलीस सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत्.
दरम्यान या घटनेमुळे पोलीस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला होता. तर parli vaijnath hospital परळी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाल्याने तणावपूर्ण शांतता आहे.