निखिल कवडे युपीएससी देशात १०८ वा ;राजूर चे नाव देशपातळीवर झळकवले!

- Advertisement -
- Advertisement -

अकोले, ता. ६: तालुक्यातील राजूर येथील भीमाशंकर कवडे यांचे चिरंजीव निखिल कवडे याने आपल्या जिद्दी,चिकाटी व आत्मविश्वास जोरावर दिल्ली येथे जाऊन अभ्यास करत यु पी एस सी परीक्षेत यश संपादन करून राजूर गावचे व कुटुंबाचे नाव देशपातळीवर चमकविले आहे .

निखिल कवडे

नुकताच त्याचा निकाल लागला आहे .पाच लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते .त्यात २६२ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यात १०८ क्रमांक मिळवत निखिल कवडे याने आपली गुणवत्ता दाखवली .ग्रामीण आदिवासी भाग असलेल्या राजूर तालुका अकोले येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षण पुणे येथे घेऊन त्याने संघ लोकसेवा आयोग म्हणजेच  युपीएससी परीक्षेत यश मिळविले DySP with central govt. या पदासाठी त्याची नियुक्ती झाली असून ५ फेब्रूवारी २०२१ रोजी निकाल जाहीर झाला आहे . तो यात समाधानी नसून आय ए एस अधिकारी   होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे निखिल कवडे म्हणाला .

निखिल कवडे

 भीमाशंकर कवडे (वडील ) सांगतात कि,माझे आजोबा नारायणदास कवडे , वडील प्रभाकर कवडे यांची इछ्या होती कि , माझा मुलगा निखील हा मोठा अधिकारी होऊन त्याने गावाचे , समाजाचे , कुटुंबाचे नाव मोठे करावे त्यप्रमाणे आज निकाल लागताच मला प्रथम त्यांची आठवण आली . ते स्वर्गवासी झाले मात्र त्यांची  इछ्या त्यांचा  नातू निखिलने पूर्ण केली याचे मला समाधान आहे .

निर्मला कवडे -(आई ) यांनी सांगितले कि, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे निखील लहानपणापासून हुशार व मोठे स्वप्न पाहणारा होता . त्याने आपल्या ज्ञाच्या जोरावर व अथक परिश्रमाने पहिला टप्पा गाठला यापुढेही त्यच्या इछ्या पूर्ण होवोत हि परमेश्वरी प्रार्थना.

आणखी वाचा :नाथऱ्याच्या गावकर्यांनी कसा केला भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा सत्कार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles