बीड –
neknoor bankatswami saptah ऐश्वर्य संपन्न संत बंकटस्वामीनी जातीपातीच्यां भिंती नष्ट करून माणुसकीची चळवळ दृढ केली. असे प्रतिपादन महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी केले. श्रीक्षेत्र नेकनुर येथे वै.श्रीगुरू बंकटस्वामी महाराज यांच्या ८० व्या पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलतं होतें.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे , श्री ह भ प सत्यवान महाराज लाटे, नाना महाराज कदम,सुरेश म जाधव, श्रीकृष्ण महाराज यादव, वसंत महाराज शिंदे, विष्णुपंत महाराज लोंढे यांच्या सह हजारो भावीक भक्त मंडळी उपस्थीत होतें..
बीड तालुक्यांतील श्रीक्षेत्र नेकनुर येथे वै.श्रीगुरू बंकटस्वामी महाराज यांच्या ८० व्या पुण्यतिथी उत्सवात पाहिल्या दिवसांचे कीर्तन पुष्प प्रेममूर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी गुफले.. यावेळी त्यानी.. संत तुकाराम महाराज यांच्या
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा I करी पापा निर्मूळ II
भाग्यवंता छंद मनी I कोड कानीं ऐकती II धृ II
विठ्ठल हे दैवत भोळे I चाड काळे न धरावी II
तुका म्हणे भलते याती I विठ्ठल चिती तो धन्य II
नामपर अभंगावर चिंतन मांडले.. यावेळी बोलताना महाराज म्हणाले की ऐश्वर्य संपन्न संत स्वानंद सुखनिवासी बंकटस्वामी यांच्यात दरबारात आज प्रत्यक्ष पांडुरंग उपस्थीत आहे..साधू संतांचे आध्यात्मिक वैभव म्हणजेच वैकुंठ आहे. संत बंकटस्वामी महाराज यांनी तपश्चर्या करुण साधना करून सिद्धता प्राप्त केली..संतांचे तत्वज्ञान माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देते..बंकटस्वामी महाराज संस्थान हे थोरले संस्थानं आहे. संपुर्ण महाराष्ट्रात वारकरी धर्माची पताका फडकावली
सप्ताहात पहील्या दिवशी मंगल करावे लागते… त्यामूळे सकाळ मंगळ निधी ! श्रीविठ्ठलाचे नाम आधी !! अनुभवाचे तत्व ज्ञान सांगणारे संत असतात. परमार्थात सर्व साधना पेक्षा सोप साधन नाम आहे..जिवनात समाधान मिळवायचे असेल तर नाम स्मरण करावे लागेल..सदा नाम घोष करू हरि कथा ! तेणे सदा चित्ता समाधान!!
सुखात समाधान नाही. समाधनात सुख आहे. आहे त्यामूळे नामस्मरण प्रत्येकानं करावं. असे महाराजांनी सांगीतले.. विठ्ठल मंत्र सोपा आहे.. त्याचा उच्चार केला तर संपुर्ण जीवन पाप मुक्त होतें. नाम जपण्याच्या अधिकार सर्वांना आहे.. जाती पातीचां भेद भाव परमार्थात नाही.
भाग्यवंत लोकं या नामाचे स्मरण करतातआणि श्रवण करतात..विठ्ठल हे दैवत भोळे आहे. जो विठ्ठल भक्ती करतो तो कोणत्याही भलत्या जातीचा पातीचा असला तरी तो धन्य आहे. असे महाराज म्हणाले..
कीर्तनास साथ संगत महाराष्ट्रातील नामंकित गायक वादक श्री ह भ प गोविंद महाराज नाईकवाडे, सिध्देश्वर महाराज बागलाने, अभिमान ढाकणे, अनिकेत महाराज लांडे, सतीश महाराज जाधव, रोहिदास महाराज शिंदे, वसंत महाराज शिंदे, यांच्यासह बंकटस्वामी फडावरील सर्व टाळकरी मंडळी उपस्थीत होतें.