Homeविधानसभा निवडणूक 2024शिरूर येथील खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेस उपस्थित रहा-गायकवाड गाडेकर

शिरूर येथील खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेस उपस्थित रहा-गायकवाड गाडेकर

शिरूर

Ncp dr Amol kolhe sabha राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे आष्टी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेस जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आणि सागर गाडेकर यांनी केले आहे.शहरातील सिद्धेश्वर संस्थान मंदिर परिसरात आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार तथा स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे.महेबुब शेख यांच्या तुतारीचा मतदारसंघात प्रचारात बोलबाला दिसत असून आतापर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार बजरंग सोनवणे यांच्या जाहीर सभा मतदारसंघात झाल्या आहेत.आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिरूर शहरात अमोल कोल्हे यांची सभा होत असून या सभेने महाविकास आघाडीचे उमेदवार महेबुब शेख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे.त्यामुळे या विजयी सभेचे साक्षीदार होण्यासाठी मतदारसंघातील मतदार बंधू,भगिनी आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आणि सागर गाडेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments