सत्तालंपट मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा

- Advertisement -
- Advertisement -

बीड प्रतिनिधी,

nawab malik latest news देशासी गद्दारी  करणाऱ्या समाजकंठका सोबत राज्याचे जेष्ठ मंत्री नवाब मलिक यांनी केलेला मनी लॉंडरिंग व्यवहार गंभीर स्वरूपाचा व आक्षेपार्ह आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कडील खरेदी व्यवहारात थेट मंत्री पदावरील व्यक्तीकडून मनी लॉंडरिंग चा गैरव्यवहार होणे हा प्रकार निंदनीय आहे.

निष्पाप जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार जनतेची फसवणूक करणारा ठरला. दहशतवादी हल्ले करून निरापराध सामान्यांचे जीव घेणाऱ्या हिंसक कृत्यास जबाबदार व्यक्तींना अप्रत्यक्ष पणे मदत करण्याचे पाप मंत्री नवाब मलिक यांचे कडून घडले आहे.

ईडीने केलेली  कारवाई योग्य असून न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेऊन  सामोरे गेले पाहिजे. तसेच निष्पक्ष पणे चौकशी होण्यासाठी मंत्री पदावरून पायउतार व्हावे.हि राज्यातील जनतेची मागणी रास्त आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आरोपी मंत्र्यासाठी मंत्रिमंडळ जर रस्त्यावर उतरत असेल तर, हे राज्याचे दुर्दैव आहे.nawab malik latest newsपुरोगामी राज्याची नितीमत्ता राखण्यासाठी मंत्री नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.

कडा कारखान्याची भाडे तत्वावरील निविदा निघाली

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या सूचनेवरून भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली  बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी ने अटक केलेले महाराष्ट्र आघाडी  सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा.

 या मागणीसाठी निदर्शन आंदोलन करण्यात आले.

nawab malik latest news

या आंदोलनात नवनाथ आण्णा शिराळे, सलीम जहांगीरदार,भगीरथ बियानी, अॅड. संगीता धसे, डॉ. लक्ष्मण जाधव,शिवाजी अप्पा मुंडे, बालाजी पवार,शांतीनाथ डोरले, भूषण पवार,दत्ता सानप,अनिल चांदणे, प्रमोद रामदासी,विलास बामणे,मनोज ठाणगे,नागेश पवार,संतोष गवळी,रामप्रसाद राऊत,नरेश पवार,संदीप उबाळे,अशोक पांढरे,सुरवसे महाराज,आरे उद्धव, अॅड. भाग्यश्री ढाकणे, संजीवनी राऊत, प्रीत कुकडेजा, संभाजी सुर्वे,पंकज धांडे,शरद बडगे,अनिल शेळके,महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, घोलप मामा, ऋषी फुंदे, लाला पन्हाळे,आमु जहागीरदार, इम्रान शेख, शेख नईम, आय्यम खान, आकाश घोरपडे,रघु सोनावणे  यांच्यासह भाजाप पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles