Aurangabad,
national anthem केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या वतीने स्वराज्य महोत्सवच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत औरंगाबाद शहरातील विभागीय क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्र गीत गायले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात 9 ते 17 आगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने केंद्रीय संचार ब्यूरो औरंगाबाद यांच्या पुढाकाराने जनतेच्या मनात स्वतंत्र लढाच्या स्मृती तेवत रहाव्या, देश भक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने विभागीय क्रीडा संकुलात सुमारे 16000 पेक्षा अधिक विद्यार्थ्याचे सामूहिक राष्ट्र गीत गायन व देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत गाउन एक रोमांच उभा केला आहे.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यक्रमास खा. इतियाज जलील, माजी विधान सभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण , अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रबंधक संतोष देशमुख, मनपा आयुक्त, सैनिकी अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रदीप पवार, तसेच विविध शाळा महाविद्यालये चे शिक्षक, कर्मचारी, प्राचार्य आदी उपस्थित होते.