नाशिक शहरात अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टरनेच केला बलात्कार

- Advertisement -
- Advertisement -

नाशिक

Nashik crime news नाशिक शहरात एका अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रुग्णालयात एकटी असल्याची संधी साधत डॉक्टरनेच अल्पवयीन परिचारीकेवर लैंगिक अत्याचार केला, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली, डॉक्टरी पेष्याला काळिमा फासला गेला आहे.

नराधम डॉक्टरने परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून कोणाला सांगितले तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली. संशयित डॉक्टराच्या अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार, ही घटना अंबड पोलीस ठाण्यातील स्वामी क्रिटीकेअर या खाजगी रुग्णालयातील आहे, संशयित डॉ. उल्हास कुटे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला असता त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेला डॉक्टरने बोलावले. ती रूममध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत दरवाजाची कडी लावून डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेवर जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी डॉक्टरकडून देण्यात आली होती.

या प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात बलात्काराचा व लैंगिक अत्याचार संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ यांच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles