बीड- प्रतिनिधी
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती मिळणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.यासाठी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी आज रेल्वे मंत्रालयाची जवाबदारी सांभाळणारे नवनियुक्त केंद्रीयमंत्री श्री.अश्विनीकुमार वैष्णव जी यांची आज दिल्लीत भेट घेतली.
रेल्वे मार्गातील समस्यांबाबत यावेळी त्यांना माहिती दिली.प्रकल्पासाठी आवश्यक राज्य सरकारच्या वाट्याचा निधी मिळत नसल्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामावर होणाऱ्या विपरीत परिणामाची चर्चा देखील याप्रसंगी केली.
आणखी वाचा : upsc करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र बार्टी मार्फत उभारणार
तसेच या प्रकल्पासंदर्भात रेल्वे विभागाची त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी व संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी केली,यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले.या भेटीमुळे निश्चितच आपल्या रेल्वेमार्गाला गती मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
सध्या या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम धानोरा , कडा इथपर्यंत आले आहे. मात्र यामध्येही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. हे पूर्ण करणे आवश्यक आहे.